बिग बॉस 14 शोमधील टॅलेंट मॅनेजरचं निधन; सेटच्या बाहेरच झाला अपघात

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

बिग बॉस 14 च्या सेटवरून एक दु:खद अशी बातमी समोर आली आहे. बिग बॉस 14 या शोच्या टॅलेंट मॅनेजरचं अपघातात निधन झालं.

नवी दिल्ली - रिअॅलिटी शो बिग बॉस 14 च्या सेटवरून एक दु:खद अशी बातमी समोर आली आहे. बिग बॉस 14 या शोच्या टॅलेंट मॅनेजरचं अपघातात निधन झालं. पिस्टा धाकड असं तिचं नाव असून यामुळे कलाकारांसह बिग बॉस 14 च्या टीमला धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून पिस्टा धाकडला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

पिस्टाचा बिग बॉस 14 च्या सेटच्या बाहेरच अपघात झाला. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं तिचं निधन झालं.  टीव्ही कलाकारांनी तिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 

बिग बॉस 14 शो तयार करणाऱी प्रोडक्शन कंपनी एंडमोल शाइन इंडियामध्ये पिस्टा काम करत होती. शुक्रावीर विकेंडचं शूटिंग संपवून ती स्कूटीवरून घरी निघाली होती. मात्र अंधारा स्कूटी स्लीप झाल्यानं खड्ड्यात पडली. त्यावेळी मागून येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅनखाली ती सापडली. पिस्टा फक्त 24 वर्षांची होती. 

पिस्टा धाकडने बिग बॉसशिवाय खतरों के खिलाडी या टीव्ही शोसाठीही काम केलं होतं. टीव्ही अभिनेत्री देवोलिनाने इन्स्टाग्रामवरून पिस्टाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तिने म्हटलं की, काल रात्रीच आम्ही बोललो होते. दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss 14 show talent manager pista-dhakad dies in accident