Big boss16:बिग बॅासच्या घरात येणार संस्कारी सून...

बिग बॅासच्या प्रोमोत दिसली छलक: चहाते उत्सुक
Nimrit Kaur Ahluwalia
Nimrit Kaur Ahluwaliaesakal

टेलिव्हिजनचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 16 सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच बिग बॉसचा प्रोमोही समोर आलाय.त्याला चाहत्यांनीही मोठा प्रतिसाद दिलाय.या वेळी कोण कोण या घरात लॅाक होणार यावरही तर्क-विर्तक लावले जात असतांना छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री 'छोटी सरदारनी' फेम निमृत कौर अहलूवालिया हिची झलक दिसली आहे

Nimrit Kaur Ahluwalia
Big Boss 16: शिल्पाचा नवरा राज कुंद्रा बिग बॉसच्या घरात, फी व डिमांड्स ऐकून बसेल झटका

'छोटी सरदारनी' फेम निमृत कौर अहलूवालिया हिची एन्ट्री फिक्स झाली आहे.यासबंधीचा प्रोमो कलर्सने त्यांच्या इंस्टाला शेअर केलाय.यात तिच नाव किंवा चेहरा स्पष्ट नसला तरी तिचा आवाज आणि झलक पाहून चहात्यांनी तिला ओळखल आहे.त्या प्रोमोच्या पोस्टचा कमेंट बॅाक्स निम्रतच्या नावानं भरलाय. त्यामुळे एक संस्कारी आणि सर्वगुणसंप्पन सून बिग बॉसमध्ये कशी खेळते आणि फॅन्सच मन जिंकुन घेते का?हे पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

यात बिग बॉस निमृतला विचारतात तु कधीच कोणत्या भांडणात हारत नाहीस.यावर ती म्हणते की मी एका लाडक्या सूने बरोबरच वकील देखील आहे,त्यामुळे हरण्याचा प्रश्नच येत नाही,बिग बॉस.त्यामुळे बिग बॉसच्या घरात किती राडा होणार याची कल्पना येते.कारण बिग बॉस म्हटंल तर राडा होणारच..आणि त्यातून प्रेक्षकांच मनोरंजनही.

Nimrit Kaur Ahluwalia
TV actressरुबिना दिलैकने कुणाला दिले हिंदीचे धडे ?

निमृत कौर अहलूवालिया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तारीकांमध्ये मोडली जाते. 'छोटी सरदारनी'या सीरीयलमुळे ती लोकप्रिय झाली. 'नाटी पिंकी की लवस्टोरी'यामध्येही ति झळकली होती.ति काही म्यूझिक व्हिडीओत आणि'खतरा खतरा खतरा'शोमध्येही दिसली.एका यशस्वी मॉडेल बरोबरच ती वकील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com