
Bigg Boss 16 Final Live Updates: MC स्टॅन जिंकला.. फॅन्सचं प्रेम सर्वांवर भारी.. बिग बॉसची ट्रॉफी पटकावली
Bigg Boss 16 Final Live: 'बिग बॉस 16'चा आज ग्रँड फिनाले आहे. गेले 4 महिने हा सिझन प्रेक्षकांमध्ये तूफान लोकप्रिय झाला. घरातील सर्व सदस्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केले. या सिझनमध्ये आपण बरेच राडे, वाद पाहिले.. त्याचबरोबर प्रेम आणि मैत्रीही तितकीच पाहिली.. आज शोचा आलिशान अशा ग्रँड फिनाले झाला. शो च्या ग्रॅंड फिनालेत टॉप 5 मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोत होते. अखेर फॅन्सच्या प्रेमामुळे सर्वांवर भारी पडून एम. सी. स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता झाला
बिग बॉस 16 मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल करणार गदर ३ चं प्रमोशन
सनी देओल आणि अमिषा पटेल बिग बॉसच्या सेटवर शोच्या फिनालेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी 'गदर 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये सहभागी होणार आहेत. दोघेही शोचा होस्ट सलमान खानसोबत मस्ती करताना दिसणार आहेत.
(sunny deol and amisha patel in bigg boss 16 for the pramotion of gadar 2)
बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला धमाकेदार सरुवात
बिग बॉस १६ च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. सलमान खान सुरुवातीलाच घरात येऊन गेलं आहे सध्या घरात सुम्बुल, निमृत, साजिद, अब्दू, श्रीजिता असे सदस्य घरात आले आहेत. घरातले सदस्य एकमेकांसोबत मजेदार कविता करत आहेत. याशिवाय कॉमेडियन भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक सदस्यांचं मनोरंजन करत आहेत.
(bigg boss 16 grand finale start)
शिव आणि अर्चना मध्ये रंगली धम्माल संगीतखुर्ची..
शिव ठाकरे आणि अर्चना गौतम मध्ये संगीतखुर्ची रंगली. एकेक करून प्रियंका, स्टॅन, शालीन, सुम्बुल, निमृत संगीतखुर्ची मध्ये सहभागी होते. सगळे एकेक करून बाद झाले. शेवटी अर्चना आणि शिव राहिले. आणि या दोघांमध्ये अर्चनाने बाजी मारली. त्यामुळे संगीतखुर्ची मध्ये अर्चना जिंकली. अर्चनाला जिंकून खूप आनंद झाला
(shiv and archana played funny game)
आज तू जिंकला नाहीस तर... साजीद खान शिवला हे काय म्हणाले
बिग बॉस 16 मध्ये साजिद खान आणि शिव ठाकरे फिनाले मध्ये एकमेकांसमोर आले. तेव्हा साजिद खान यांनी शिवसाठी भावना शेयर केल्या. त्यावेळी साजिद खान शिव साठी म्हणाले... शिवने बिग बॉस साठी खूप मोठं स्वप्न पाहिलंय. जर आज तू जिंकला नाहीस.. असं समज कि आज तू जिंकला नाहीस तर अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस..
कारण प्रेक्षकांनी दिलेलं वोट सर्व महत्वाचं आहे.. शेवटी सर्व गोष्टी त्यांच्यावर अवलंबून आहेत. असं साजिद खान शिवला म्हणाले
(sajid khan advised to shiv thakare)
सलमान खानने केलं या सिझनचं कौतुक.. मानले प्रेक्षकांचे आभार
बिग बॉस १६ च्या ग्रँड फिनालेत सलमान खानची दमदार एंट्री झाली. एम.सी. स्टॅन , शिव ठाकरे, शालीन भानोत, प्रियंका चौधरी आणि अर्चना गौतम टॉप ५ स्पर्धक आहेत. यावेळी सलमान खानने या सिझनचं कौतुक केलं. सलमान म्हणाला,"हा सिझन बिग बॉसच्या सर्वात यशस्वी सिझन आहे. सर्वांचे आभार. सर्वांनी १९ आठवडे धम्माल केली" असं सलमान म्हणाला
(salman khan thanks to audience for making hit of bigg boss 16)
शो संपला आतातरी सुधर.. शिवची आई अर्चनाला स्पष्टच म्हणाली
बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार हे थोड्या वेळातच कळेल. सलमान खानने ग्रँड फिनालेसाठी शानदार एंट्री केली. यावेळी टॉप ५ सदस्यांच्या आई घरात आलेल्या. तेव्हा शीवच्या आईने अर्चना गौतमचं लग्न जुळवणार असल्याचं सांगितलं. सलमान खान समोर शिवच्या आईने हि इच्छा बोलून दाखवली.
इतकंच नव्हे अर्चनाच्या आई समोर सुद्धा शिवची आई अर्चनाचं लग्न लावणार असं म्हणाली. त्यामुळे अर्चनाच्या लग्नाची जबाबदारी शिवच्या आईने स्वीकारल्याचं दिसतंय
( shiv thakare mother making plan of archana gautam wedding)
शालीन भानोत घराबाहेर.. शालीनचा मोठा अपेक्षाभंग
बिग बॉस १६ मधून शालीन भानोत घराबाहेर गेलाय. सर्व सदस्यांना आपापसात विचार करून एकाला घराबाहेर काढायचं होतं. शालीनने समजवायचा खूप प्रयत्न केला. पण सगळे जण शालीनच्या नावावर ठाम होते.
अखेर सलमानने कमी वोट मिळाल्याने शालीन घराबाहेर गेला असं सांगितलं आहे. त्यामुळे शालीनचा बिग बॉस मधला प्रवास संपला आहे. आता विजेत्याला १० लाख रुपये वाढवून मिळणार आहेत. त्यामुळे आता विजेत्याला ३१ लाख ८० हजार मिळणार आहेत.
शालीनला घराबाहेर आल्यावर एकता कपूरचा बेकाबू नावाचा शो मिळालाय. एकताने व्हिडिओ बनवून सर्वांसमोर घोषणा केली
(shalin bhanot evicted from bigg boss 16, got new serial of ekta kapoor)
'किसी का भाई किसी का जान' सिनेमाचं पहिलं गाणं ग्रँड फिनालेमध्ये लाँच
बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले आलिशान पद्धतीने रंगत आहे. नुकतंच शालीन भानोत घराबाहेर गेलाय. ग्रँड फिनालेच्या गडबडीत सलमानने त्याच्या आगामी किसी का भाई किसी का जान (kisi ka bhai kisi ki jaan) सिनेमातलं नैय्यो लगदा हे गाणं लाँच केलंय. हा सिनेमा ईद 2023 ला रिलीज होतोय. नवीन सिनेमात सलमान भाईचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
(kisi ka bhai kisi ki jaan movie first song launch at bigg boss 16)
अखेर अर्चना गौतम घराबाहेर, सलमान खानने दिला धीर
अर्चना गौतम बिग बॉस मधून बाहेर गेलीय. अर्चना टॉप 4 मधून आत्ता बाहेर गेलीय. अर्चना जाताना खूप रडत होती. तिने सर्वांचे आभार मानले. पुढे अर्चना आई बाबांसमोर सुद्धा रडली. सलमानने गमतीशीर अंदाजात अर्चनाला निरोप दिला
(archana evicted from bigg boss 16 and got cried)
गदर २ चं प्रमोशन करण्यासाठी सनी देओल आणि अमीषा बिग बॉस 16 मध्ये
बिग बॉस १६ च्या ग्रँड फिनालेमध्ये तारा सिंग आणि सकिना म्हणजेच सनी देओल आणि अमीषा यांनी बिग बॉस 16 मध्ये एंट्री केली. गदर २ चं प्रमोशन करण्यासाठी दोघेच आलेले. त्यावेळी अब्दू छोटा सनी पाजी बनून सनी देओलला भेटायला आला होता.
अब्दूला सनी देओलने उचलून घेतलं. गदर 2 यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. प्रेक्षकांनी बऱ्याच दिवसांनी अमिषा पटेलला पडद्यावर पाहिले आहे.
(sunny deol ani amisha patel pramote gadar 2)

तीन फायनलिस्ट उरले.. घरातले दिवे कोण करणार बंद?
शालिन भानोतनंतर आता अर्चना गौतम बिग बॉस मधून बाहेर गेलीय. अर्चना टॉप 4 मधून आत्ता बाहेर गेलीय. त्यामुळे आता सिझनला त्याचे तीन फायनलिस्ट मिळाले आहेत.
आता घरात प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन उरलेले आहेत त्यामुळे आता प्रतिक्षा शिगेला पोहचली आह. घरातील दिवे बंद करण्यासाठी आता घरात कोण दोन फायनलिस्ट उरतात हे थोड्या वेळातच कळेल.
(bigg boss 16 top 3 finalist)
टिनाची ईच्छा पूर्ण झाली.. सलमान सोबत सायकल सवारी
ग्रँड फिनालेला कृष्णा अभिषेक सदस्यांना हसवायला आला होता. टिनाला सलमान खान सोबत डान्स करण्याची इच्छा होती. अखेर ती इच्छा वेगळ्या रीतीने पूर्ण झाली. टिना आणि सलमानने स्टेजवर सायकल सफर केली. सलमान टिनाच्या मागे असा बसला होता की सगळे हसून हसून दमले..
(tina wish complete.. tina cycle ride with salman khan in bigg boss 16 grand finale)
प्रियंका बिग बॉस मधून बाहेर? धक्कादायक निकाल.. चाहत्यांची निराशा
बिग बॉस 16 मधून प्रियंका चहर चौधरी घराबाहेर गेली आहे. प्रियंकाचं स्वप्न भंगल असल्याने तिच्या फॅन्सची प्रचंड निराशा झाली आहे. प्रियंका फायनलची दावेदार होती. पण आत्ता प्रियंका घराबाहेर गेल्याने सर्वांना धक्का बसलाय..
प्रियंका घराबाहेर गेल्याने स्टॅन आणि शिव हे दोन खास मित्र आता घरातले दिवे बंद करणार आहेत.
(Priyanka Chahar choudhary evicted from bigg boss 16.. shocking eviction)
शिव स्टॅनला खांद्यावर घेऊन आनंदात नाचला, घरातले दिवे बंद करणार
प्रियंका चौधरी घराबाहेर गेली आहे. त्यामुळे एम. सी. स्टॅन आणि शिव ठाकरे घरात टॉप 2 उरले आहेत. प्रियंकाचं जाण्याचं दोघांना दुःख होतं. पण जेव्हा शिवला जाणीव झाली की स्टॅन आणि तो टॉप 2 आहेत तेव्हा तो नाचला. तो stan ला खांद्यावर घेऊन नाचला. अशाप्रकारे शिव आणि stan घरातले दिवे बंद करून बाहेर येणार आहेत.
(shiv thakare and MC Stan celebration for Top 2)
MC स्टॅनने बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल आहे
MC स्टॅनने बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल आहे. Mc stan जिंकल्यानंतर मंडलीने एकच जल्लोष केला. एम. सी स्टॅनला 31 लाख 80 हजार इतकी प्राईझ मनी मिळाली आहे. याशिवाय आलिशान हुंडाई गाडी बक्षीस म्हणून मिळाली आहे
(MC Stan is the winner of Bigg Boss 16)