“त्वाडा कुत्ता टॉमी,साडा कुत्ता कुत्ता” शहनाज गिलच्या व्हिडीओला 16 लाख हिट  

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 10 December 2020

सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो संगीत निर्माता यशराज मुखातेने तयार केला आहे.

मुंबई -  सोशल मीडियावर काही व्हायरल व्हायचा अवकाश की त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून येते. बिग बॉसचे यंदाचे पर्वही नेहमीप्रमाणे त्यातील सहभागी स्पर्धकांच्या सोशल मीडियाच्या वॉर मुळे प्रसिध्दीस आले आहे. नुकताच शहनाजच्या एका व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. यात ती एकावर चांगलीच वैतागली आहे.

शहनाजच्या या व्हिडिओला कमी वेळेत सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या व्हिडीओला जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. यापूर्वीही बिग बॉसमध्ये स्पर्धक असलेल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे त्या स्पर्धकांना चांगली प्रसिध्दी मिळाल्याचे दिसून आले आहे. राहुल वैद्य, जान सानू, निक्की तांबोळी, शहनाज गिल, रुबिना दिलैक हे स्पर्धक सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहेत.

सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो संगीत निर्माता यशराज मुखातेने तयार केला आहे. त्याने यापूर्वी साथ निभाना साथिया च्या डायलॉगवर एक मजेदार रॅप बनविलं होतं.विशेष म्हणजे तो व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता वरुण धवन, राजकुमार या दिग्गजांनीही या रॅपचं कौतुक केलं होतं.

तुम्हाला आठवतयं, काही दिवसांपूर्वी सोडे में कौन था?’ अशा वाक्याचं एक गाणं हिट झालं होतं. त्या गाण्यानं सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवली होती. साथ निभाना साथिया या मालिकेतील कोकिलाबेन यांच्या डायलॉगवरील हे गाणं यशराज मुखातेने तयार केलं होतं. यशराजने  आणखी एक गाणं तयार केलं असून हे गाणं ‘बिग बॉस’फेम शहनाज गिलवर आधारित आहे. त्या व्हिडिओला 16  लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

2020 ची सर्वाधिक लोकप्रिय मालिका; 'स्कॅम 1922' आयएमडीचं रेटींग '9.5'

या व्हिडिओमध्ये  ‘बिग बॉस’च्या घरात शहनाज काही कारणास्तव दु:खी होती ती विशाल व आदित्यसोबत चर्चा करत होती.  रागाच्या भरात ती, “त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता”, असं म्हणते.  या बोलण्यावर यशराज मुखातेने नवीन गाणं तयार केलं आहे.शहनाजचा “त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता” हा डायलॉग ऐकल्यानंतर यशराजने त्याला संगीत देत नवीन गाणं तयार केलं. विशेष म्हणजे शहनाजचा हा डायलॉग आधीपासूनच पॉप्युलर झाला होता. मात्र गाण्यानं त्याला आणखी लोकप्रियता दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big boss fame Shahnaz Gill Tommy dialogue video viral