विनीत भोंडे गिरवतोय, 'बिग बॉस मला माफ करा...'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते.

मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही रहिवाशी बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असेच काहीसे विनीत भोंडे बद्दल झाल्याचे दिसून येते. पहिल्या दिवसापासून विनीत भोंडेला त्याचा माईक विसरण्याची सवय आहे. इतकेच नव्हे तर कॅप्टनसीच्या दरम्यान देखील त्याची ही सवय गेली नाही. याच कारणामुळे तो आता बिग बॉसच्या शिक्षेस पात्र ठरणार आहे. विनीतच्या या बेफिकीर स्वभावावर घरतल्या इतर मंडळींनी देखील बऱ्याचदा आक्षेप घेतल्याचे दिसून आले आहे. 

Vinit Bhonde

बिग बॉसच्या आदेशानुसार विनीत भोंडेला गार्डन एरियामध्ये बसून “बिग बॉस मला माफ करा” असे त्याला पाटीवर लिहीहायचे आहे आणि तेही बिग बॉसचा पुढचा आदेश मिळेपर्यंत. विनीतच्या या स्वभावामुळे घराचा कॅप्टन आस्ताद काळेने त्याच्यावर नाराजगी व्यक्त केली. आपण त्याचे पालक नाही, असे देखील तो म्हणाला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Big Boss has been punished Vinit Bhonde