बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांची एन्ट्री; असे आहे बिग बॉसचे घर...

चिन्मयी खरे
सोमवार, 16 एप्रिल 2018

जेव्हा या 15 स्पर्धकांनी बिग बॉस हाउसमध्ये एंन्ट्री गेली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबई - कलर्स मराठीवर सुरु झालेल्या बहुचर्चित 'बिग बॉस' या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले आहेत.
हिंदी बिग बॉसची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात आहेच पण आता मराठी कलाकारांना घेऊन मराठमोळं बिग बॉस लोकांच्या पसंतीस उतरतंय का हे लवकरच कळेल. 

उषा नाडकर्णी, स्मिता गोंदकर, आरती सोळंकी, आस्ताद काळे, जुई गडकरी, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, राजेश श्रृंगारपुरे, अनिल थत्ते, भूषण कडू, मेघा धाडे, ऋतुजा धर्माधिकारी, सई लोकुर, सुशांत शेलार, विनीत भोंडे या मराठीतील 15 कलाकारांनी 100 दिवस या बिग बॉसच्या घरात राहण्याचं चॅलेंज स्विकारलं आहे. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क राहणार नाही. पण हे बिग बॉसचं घर म्हणजे नेमकं आहे तरी कसं? हिंदी बिग बॉस प्रमाणेच की काही वेगळा सेटअप करण्यात आला आहे. तर हो, मराठमोळ्या बिग बॉस हाउससाठी आणि मराठमोळ्या स्पर्धकांसाठी खास वाडा बनविला आहे. ओमंग कुमार यांनी सुंदर असं बिग बॉसचं घर बनवलं आहे. 

Image may contain: indoor
 
जेव्हा या 15 स्पर्धकांनी बिग बॉस हाउसमध्ये एन्ट्री गेली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा भव्य वाड्याचा सेट, प्रत्येक गोष्ट सुंदर प्रकारे डिझाईन केली असून, त्याच्यावर खूप रंगकाम देखील केलेले आहे. अंगण मऊसर गवताने पांघरलेले आहे. घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, लिव्हिंग रूम, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, व्यायाम करण्यासाठी घराच्या दरवाजाच्या एका बाजूला साधनसामुग्री आहे तर घराचं अंगण विविध मातीच्या शोभेच्या भांड्यांनी सजविलेलं आहे. पुरूषांच्या आणि स्त्रीयांच्या झोपायच्या खोल्याही वेगवेगळ्या आहेत. पुरूषांच्या खोलीच्या बाहेर मोठ्ठी शोभेसाठी कोल्हापूरी चप्पल लावण्यात आली आहे तर स्त्रीयांच्या खोलीबाहेर मराठमोळं प्रतिक म्हणून मोठी नथ लावण्यात आली आहे. अशा सगळ्याच गोष्टींनी या सेलिब्रिटीजना अवाक केले. पुरूषांच्या खोलीत निळ्या रंगाची रंगसंगती पाहायला मिळत आहे तर राजवाड्यातील खिडक्‍यांची आणि दरवाज्याची थीम केली गेली आहे. स्त्रीयांच्या खोलीत गुलाबी रंगाची थीम करण्यात आली आहे तर संपूर्ण भिंत फुलांनी सजलेली आहे. तसेच बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा 'रहीवाशी संघ' असा बोर्ड आहे. जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिलेली आहेत.

Image may contain: indoor
Aarti Solanki

Megha Dhade
Astad Kale
Resham Tipnis
Usha Nadkarani
Sai Lokur
Anil Thatte

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू
शकता.

Web Title: Big Boss Marathi House Design and Constant