इथे दिसतं...तसंच असतं ! – 'बिग बॉस मराठी'चा पहिला सिझन 15 एप्रिलपासून

रविवार, 8 एप्रिल 2018

मुंबई : जगातील 92 हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेला 'बिग बॉस' 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर येत आहे. बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

मुंबई : जगातील 92 हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेला 'बिग बॉस' 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर येत आहे. बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार. इथे मोबाईल नसेल, टेलिव्हिजनसुध्दा नसेल, आणि पुस्तकं वाचण्याची किंवा काहीही लिहिण्याची संधी देखील नसेल अशा सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त त्यांना या घरामध्ये एकमेकांसोबत १०० दिवस रहायचं म्हणजे काही सोपं नाही !

या 100 दिवसांत प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धकांद्वारे तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नॉमिनेट करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरी पर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहील तो ठरेल पहिल्या सिझनचा विजेता स्पर्धक. बिग बॉसचं हे मराठमोळं रुपं बघायला विसरू नका येत्या १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Web Title: big boss marathi starting from 15 april colors marathi