
Bigg Boss | हारल्यानंतरही तेजस्वीनीची ट्रॉफी 'तो' छातीशी धरून रडत होता!
बिग बॉस हिंदीच्या सिजन १५ मध्ये रोमांचकारी क्षण अनुभवायला मिळाले. या रिअॅलिटी शो च्या ग्रँड फायनलमध्ये तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सहेजपाल यांच्यात चुरस पाहायला मिळाली. या सिझनच्या फायनलमध्ये दोघांची एन्ट्री झाली आणि त्यानंतर सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. (Bigg Boss Season 15)
फायनल सिझनची विजेती तेजस्वी प्रकाश असल्याची घोषणा सलमान खानने केली आणि तिच्या कुटुंबांच्या डोळ्यात पाणी आलं. पण याच वेळी सलमानने असं काही केलं, ज्यामुळे रनरअप ठरलेला प्रतिक स्तब्ध झाला. (Bigg Boss winner)
अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये अनेक स्पर्धकांन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसलं. त्यामध्ये शमिता शेट्टी, करण कुंद्रा, निशांत भट्ट यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. पण बिग बॉसच्या 15 व्या सीझनचे विजेतपद तेजस्वीने मिळवलं. तिच्या विजयाची शाश्वती चाहत्यांना होती. गेल्या काही दिवसांत तिनं आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आणि सरतेशेवटी तिलाच यश मिळालं. (Bigg Boss winner Tejasswi)
तेजस्वीने हातात माईक घेताच प्रतिक रडू लागला
या विजयाची घोषणा सलमान खानने केली. अनेक वर्षांपासून तो या रिअॅलिटी शोचा अँकर आहे. भाईजानने घोषणा केल्यानंतर तेजस्वीला (Tejasswi Prakash) विश्वासच बसत नव्हता. ती आश्चर्याच्या धक्क्यात होती. यावेळी तिला बोलण्यासाठी माईक देण्यात आला. आणि सलमानने तिच्या हातातली ट्रॉफी प्रतिककडे दिली.
ट्रॉफी न मिळाल्याचं दु;ख प्रतिकच्या चेहऱ्यावर झळकत होतंच पण हारल्यानंतर हातात ट्रॉफी आल्याने तो भूवक झाला आणि थेट सन्मानचिन्ह त्याने छातीशी घट्ट धरलं! भावूक झालेल्या प्रतिकच्या डोळ्यात पाणी आल्याचं चाहत्यांनी पाहिलं.
Web Title: Big Boss Season 15 Winner Bigg Boss Runners Up Tejasswi Prakash Winner Patik Sehejpal News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..