#MeToo : बॉलिवूडच्या 'या' 11 महिला दिग्दर्शकांचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

बॉलिवूडच्या 11 महिला दिग्दर्शकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणाही या महिला दिग्दर्शक कमिटीने केली आहे.

मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज उठविला आहे. यातच बॉलिवूडच्या 11 महिला दिग्दर्शकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणाही या महिला दिग्दर्शक कमिटीने केली आहे.

या 11 महिला दिग्दर्शकांनी सोशल मिडीयावर एक पत्र जाहीर केलं आहे. ज्यात लिहीलं आहे की, 'इंडस्ट्रीतील अशा कोणत्याच व्यक्तीसोबत काम करणार नाही, ज्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप सिध्द झालेले आहेत.' या पत्रात या 11 महिला दिग्दर्शकांची नावंही देण्यात आली आहे. 

अभिनेत्री आणि दिग्दर्शक कोंकणा सेन-शर्मा हिने हे पत्रक आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलं आहे. पत्रकात रुची नारायण, सोनाली बोस, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कटगी, किरण राव, कोंकणा सेन-शर्मा, मेघना गुलजार, अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे आणि जोया अख्तर ही नावं आहेत. या पत्रकाद्वारे मीटू मोहिमेला पाठींबा देत असल्याचे म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision of women directors of Bollywood under MeToo campaign