13 वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न; बिग बॉस फेम अभिनेत्रीचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

बिग बॉस फेम आरती सिंगनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. आरतीनं आपल्यावर 13 वर्षांची असताना बलात्काराचा प्रयत्न झाला होता, असे सांगत सर्व स्पर्धकांना हादरून सोडले.

मुंबई : बिग बॉसचा तेरावा सध्या खुपच चर्चेत आला आहे. यामध्ये एका अभिनेत्रीने खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळे या रिअॅलिटी शो मध्येच नव्हे तर बाॅलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. 

बिग बॉसचा तेरावा हंगाम हा सगळ्यात मोठा हंगाम मानला जात आहे. यात हंगामात दरदिवशी वेगवेगळ्या विषयांवर भांडण होत असतात. सलमान खान मुख्य होस्ट असलेला हा शो आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. दरम्यान या हंगामाच्या आज प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये बिग बॉस फेम आरती सिंगनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. आरतीनं आपल्यावर 13 वर्षांची असताना बलात्काराचा प्रयत्न झाला होता, असे सांगत सर्व स्पर्धकांना हादरून सोडले.

'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

आरती सिंग आपल्यावर झालेल्या या अतिप्रसंगाची कहानी सांगतानाचा एक प्रोमो बिग बॉसनं रिलीज केला आहे. यात सर्व स्पर्धेत छपाक सिनेमातील प्रमुख अभिनेत्री दीपिका दीपिका पादुकोण आणि अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि लक्ष्मी अग्रवाल 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस (बिग बॉस 13) च्या घरी पोहोचल्या. यासाठी चॅनेलने एक प्रीकॅप व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये घरातील स्पर्धेत त्यांच्याबरोबर आपल्यासोबत घडलेल्या काही वाईट क्षणांची आठवण करुन भावुक होताना दिसत आहेत.

bigg boss 13                                          13

बिग बॉस 13च्या आजच्या भागात अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहसोबतच विशाल, मधुरिमा आणि रश्मी देसाई यांनी आपल्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांना उजाळा दिला. या व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगने एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की लहान असताना तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला गेला. आरतीनं यावेळी, 'जेव्हा मी 13 वर्षांचा होतो, तेव्हा मला घरात बंद करून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगितले. आजही या अनुभवाची आठवण आल्यानंतर आरतीला अश्रु अनावर होतात, असेही ती म्हणाली.

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

यानंतर विशाल आदित्य सिंगनेही आपली कहाणी सांगितली आणि मधुरिमा तुलीनं लैंगिक छळ झाल्याचा खुलासा करत त्या कटु आठवणींमुळे ती ढसाढसा रडू लागली. या सगळ्या कथा ऐकून स्पर्धकांसह दीपिका आणि विक्रांतही भावूक झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 13 aarti singh tells she was locked up in house and got raped at age of 013