
सलमान खानच्या या वादग्रस्त रिऍलिटी शोमध्ये प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट दिसून येणार आहेत.
मुंबई- छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी स्पर्धक किंवा मग पाहुणे म्हणून येत असतात. आता सलमान खानच्या या वादग्रस्त रिऍलिटी शोमध्ये प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट दिसून येणार आहेत.
सोनाली फोगट 'बिग बॉस १४' मध्ये येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. आता सोशल मिडियावर त्यांचे बिग बॉसच्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्या 'बिग बॉस १४' च्या सगळ्या स्पर्धकांना भेटतावा दिसत आहेत. या फोटोंमध्ये सोनाली फोगट पिवळ्या रंगाची साडीत सगळ्यांना हात जोडून त्यांची भेट घेत असल्याचं दिसतंय.
सोनाली फोगट बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये दिसून येणार आहेत. तर सोशल मिडियावर देखील 'बिग बॉस १४' शी संबंधित त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या शोचे प्रेक्षक आणि तमाम सोशल मिडिया युजर्स सोनाली फोगटच्या या फोटोंना पसंत करत आहेत. त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर 'बिग बॉस १४' च्या फॅनपेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.
सोनाली फोगट यांनी टिकटॉकवर त्यांचे व्हिडिओ बनवत लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या व्हिडिओंना लाखो लोक पसंत करत होते. मात्र टिकटॉक आता भारतात बंद झालं आहे. तर सोनाली फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्या मात्र त्या जिंकू शकल्या नाहीत.
bigg boss 14 bjp leader and tiktok star sonali phogat will seen in salman khan show