'तिच्यासाठी प्रार्थना करा'; कॅन्सरग्रस्त आईसाठी राखी सावंतची विनंती 

rakhi sawant
rakhi sawant

'बिग बॉस'च्या चौदाव्या सिझनचा टीआरपी खाली घसरत असताना अभिनेत्री राखी सावंतला घरात आणलं गेलं. राखीने शोच्या टीआरपीसाठी तिच्या परीने प्रयत्न केले आणि अंतिम फेरीत १४ लाख रुपयांची ऑफर स्वीकारत तिने स्पर्धेतून माघार घेतली. राखीने हे १४ लाख रुपये का स्वीकारले, यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. आईच्या उपचारासाठी तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राखीने आईचे फोटो पोस्ट करत तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 

राखीची आई कर्करोगाशी झुंज देत आहे. 'प्लीज माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत', असं कॅप्शन देत राखीने आईचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कमेंटमध्ये अनेकांनी तिच्या आईसाठी प्रार्थना केली आहे तर काहींनी राखीलाही खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. 'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मला अखेरपर्यंत स्पर्धेत राहायचं होतं. पण दुसरीकडे पैसेसुद्धा महत्त्वाचे होते. आईच्या उपचारासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करतेय. सध्या तिच्या किमोथेरेपी सुरू असून त्यासाठी बराच पैसा खर्च होतोय. त्यामुळे मी मागचा पुढचा काहीच विचार न करता आधी १४ लाख रुपये स्वीकारले आणि घराबाहेर पडली. मी माझ्या चाहत्यांची निराशा केली हे मला ठाऊक आहे. पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता."

वादग्रस्त विधान किंवा एखादा पब्लिसिटी स्टंट करून राखी नेहमीच चर्चेत असते. 'बिग बॉस १४'च्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती. मात्र जेव्हा तिच्यासमोर १४ लाख रुपये घेऊन माघार घेण्याचा पर्याय दिला गेला तेव्हा तिने लगेच तो पर्याय स्वीकारला. या १४ लाख रुपयांसाठी राखी आणि निक्की तांबोळीमध्ये स्पर्धा रंगली होती. मात्र राखीला पैशांची जास्त गरज आहे, असं म्हणत निक्कीने ती संधी गमावली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com