बिग बॉस १४: जान सानूचा खुलासा, आई सहा महिन्यांची प्रेग्नंट असताना आई-वडिल विभक्त झाले

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 9 October 2020

जान सानूची घरातल्या दुस-या स्पर्धकांसोबत चांगली मैत्री झाली आहे. याच दरम्यान त्यांने या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. 

मुंबई- ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानुचा मुलगा जान कुमार सानू बिग बॉस १४ मध्ये दिसून येतोय. हळूहळू तो फॉर्ममध्ये येत चालला आहे. घरातल्या दुस-या स्पर्धकांसोबत त्याची चांगली मैत्री झाली आहे. याच दरम्यान त्यांने या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. 

हे ही वाचा: 'बिग बॉस' फेम अभिनेत्री सना खानने इस्लामचं कारण देत फिल्म इंडस्ट्री मधून घेतली एक्झिट  

जान सानू याने सांगितलं की त्याची आई सहा महिन्यांची प्रेग्नंट होती तेव्हा त्याचे आई वडिल एकमेकांपासून विभक्त झाले. जान बिग बॉसची स्पर्धक जास्मिन भसीन, सारा गुरपाल सिंह आणि इतर स्पर्धकांसोबत बसला होता. तेव्हा त्याने सांगितलं की जेव्हा त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला तेव्हा ती सहा महिन्यांची प्रेग्नंट होती. जान त्याच्या आईसोबतंच राहायचा. जानने सांगितलं की, 'माझी आईच माझ्यासाठी आईपण आहे आणि वडिल पण. बिग बॉसच्या घरात येण्याआधी मला हीच काळजी होती की माझ्या आईची देखभाल कोण करेल.प्रेमाबदद्ल बोलायचं झालं तर माझे विचार जुन्या काळातले आहेत की प्रेम केवळ एकाच व्यक्तीसोबत होतं आणि त्याच व्यक्तीसोबत राहिलं पाहीजे जसी माझी आई. '

या शोमध्ये येण्याआधी जान कुमार सानुने त्याच्या वडिलांच्या रिऍक्शनबाबत सांगितलं होतं. जानने सांगितलं की 'त्यांनी मला विचारलं की तुझं नक्की ठरलंय का यासाठी? माझा आत्मविश्वास पाहून ते देखील खूप उत्सुक झाले. या शोसाठी त्यांनी मला काही टीप्स देखील दिल्या. मला गर्व आहे की माझ्या वडिलांना देशातील जनतेने एवढं प्रेम दिलं. मी हीच प्रार्थना करेन की जेवढं प्रेम माझ्या वडिलांन मिळालं तेवढंच जर मला मिळालं तर मी खूप पुढे जाऊ शकेन.'  

bigg boss 14 contestant jaan kumar sanu reveals his parents separation  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 contestant jaan kumar sanu reveals his parents separation