esakal | 'कुणी विकी डोनर नको, तर नव-याकडूनच हवं बाळ'
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss 14 finale rakhi sawant said she want to experience motherhood not vicky donar have eggs frozen

यंदाच्या स्पर्धेत रुबीनानं बाजी मारली आहे. दुस-या स्थानावर राहुल वैद्यला समाधान मानावं लागलं होतं.  

'कुणी विकी डोनर नको, तर नव-याकडूनच हवं बाळ'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बिग बॉसच्या शो मध्ये राखी सावंतनं ज्या पध्दतीनं टीआरपी क्रिएट केला तसे कुणाला जमले नाही. वास्तविक राखीला बिग बॉसमध्ये यश मिळेल अशी शक्यता फार कमी होती. मात्र तिनं स्वताविषयी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. 14 लाख रुपये घेऊन राखी बाहेर पडली होती. तिची चर्चा होत राहिली. बिग बॉसला प्रेक्षकवर्ग मिळावा म्हणून राखीनं केलेले प्रयोग सक्सेस झाले होते.

यंदाच्या स्पर्धेत रुबीनानं बाजी मारली आहे. दुस-या स्थानावर राहुल वैद्यला समाधान मानावं लागलं होतं. आता राखीनं आपल्याला संसारात लक्ष द्यायचे असल्याचे सांगितले आहे. बिग बॉसच्या शेवटच्या फेरीत निक्की तांबोळी, अली गोनी, रुबीना, राहूल वैद्य, रुबीना यांचा समावेश होता. यासगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. स्पर्धेनंतर राखीनं जे काही सांगितले आहे त्यामुळे ती पुन्हा ट्रोल व्हायला लागली आहे.

जेव्हा राखी शो मध्ये होती तेव्हा तिचे आणि अभिनव शुक्लाच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्यामुळे तिनं वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. कधी पूर्ण शरीरावल आय लव यु लिहून तिनं अभिनवला प्रपोज केले होते. तर कधी त्याच्या पायाशी लोळण घेत मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असेही तिनं सांगितले होते. आता राखीनं एक मोठं विधान केलं आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. राखी म्हणाली, मला आई व्हायचं आहे. मात्र त्यासाठी मला कुठल्या विकी डोनरची गरज नाही तर एका पित्याची आवश्यकता आहे.

ही गोष्ट राखीनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. यावेळी राखीनं आपल्या काही वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या आहेत. आई होणं याला मी प्राधान्य देणार आहे. ती प्राथमिकता आहे. मात्र मुलांसाठी मला पिता हवा आहे.  राखी म्हणाली, मला मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे. सिंगल मदर म्हणून राहणे मला पसंद नाही. माहिती नाही की हे सगळे कसे होणार? बिग बॉसमध्ये राखीनं सांगितले होते की, तिनं लग्न केलं आहे. तिच्या पतीचं नाव रितेश असं आहे. लग्नानंतर आपण त्याला लगेच सोडून दिल्याचेही तिनं सांगितले होते.