बिग बॉस १४: जॅस्मिन भसीनच्या एविक्शनमुळे अली गोनी ढसाढसा रडला, आला पॅनिक अटॅक

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 11 January 2021

जॅस्मिन घरातून बाहेर जाण्याच्या घोषणेने अली गोनी पूर्णपणे कोसळला. तो जॅस्मिनला मिठी मारुन खूप रडला.

मुंबई- 'बिग बॉस १४'च्या घरातून जॅस्मिन भसीनचं एविक्शन झाल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रु आले. इतकंच काय तर अभिनेता सलमान खान देखील स्वतःचे अश्रु आवरु शकला नाही. अली गोनीची तर रडून रडून अवस्थाच वाईट झाली. जॅस्मिन घरातून बाहेर जाण्याच्या घोषणेने अली गोनी पूर्णपणे कोसळला. तो जॅस्मिनला मिठी मारुन खूप रडला. तो इतका रडत होता की त्याला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला.  

हे ही वाचा: दीपिका-हृतिकची जोडी पडद्यावर झळकणार, आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज  

रविवारी एविक्शनासाठी सलमानने रुबिना, अभिनव, जॅस्मिल आणि अलीला  एका एका बॉक्समध्ये उभं केलं होतं. एक एक करुन सलमान सगळ्यांना फ्रीज आणि रिलीज करत होता. सगळ्यात शेवटी सलमानने जॅस्मिनचं नाव घेतलं आणि म्हणाला 'सॉरी बेबी'. जॅस्मिनचं नाव ऐकून अली कोसळला आणि ढसाढसा रडायला लागला. तो सलमानकडे जाण्यासाठी हट्ट करायला लागतो. अली म्हणतो तो जॅस्मिनशिवाय राहू शकत नाही. त्याला देखील जायचं आहे.

Bigg Boss 14: Netizens are divided over Jasmin Bhasin's elimination, and Aly  Goni and Salman Khan's reaction on the same — view tweets

अली इतका भावूक होतो आणि रडतो कि त्याला पॅनिक अटॅक येतो. सगळेचजण अलीला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अलीला त्याचा पंप आणून दिला जातो. रुबीना त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. सलमान देखील अलीला शांत होण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी सांगत असतो. मात्र घरातून बाहेर पडताना जॅस्मिन प्रेम व्यक्त करत त्याला जिंकून येण्यासाठी सांगते. जॅस्मिन घरातून बाहेर गेल्यानंतर अली पाण्याची बॉटल फेकतो. राहुल वैद्य आणि रुबीना त्याला समजवतात. त्यानंतर तो रुममध्ये बसून एकटा रडतो आणि बोलतो की मी तिच्यासाठी आलो होतो. अली जॅस्मिनसाठी या गेममध्ये आला होता. दोघंही एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते.   

bigg boss 14 jasmin bhasin elimination aly goni asthma attack cries like a baby  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 jasmin bhasin elimination aly goni asthma attack cries like a baby