बिग बॉस १४: स्वतःला सिंगल म्हणवणारी सारा गुरपाल वादाच्या भोव-यात, पंजाबी गायकाने केला तिच्यासोबत लग्न झाल्याचा दावा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 5 October 2020

'बिग बॉस १४' ची स्पर्धक सारा गुरपालचं नाव यात सगळ्यात आधी समोर आलंय. पंजाबी इंडस्ट्रीमधून 'बिग बॉस'च्या घरात आलेली सारा गुरपालला एका पंजाबी गायकाने ती त्याची पत्नी असल्याचा दावा केला आहे.

मुंबई- 'बिग बॉस १४' सुरु होऊन दोन दिवस झाले तर लगेचच शोमधील स्पर्धक वादाच्या भोव-यात यायला सुरुवात झाली. 'बिग बॉस १४' ची स्पर्धक सारा गुरपालचं नाव यात सगळ्यात आधी समोर आलंय. पंजाबी इंडस्ट्रीमधून 'बिग बॉस'च्या घरात आलेली सारा गुरपालला एका पंजाबी गायकाने ती त्याची पत्नी असल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा: संजय दत्तचा हॉस्पिटलमधून व्हायरल झाला 'हा' फोटो, संजूबाबाला अशा अवतारात पाहून चाहत्यांना बसला धक्का 

पंजाबी गायक तुषार कुमारने दावा केला आहे की '१६ ऑगस्ट २०१४ साली जालंधरमध्ये दोघांनी लग्न केलं होतं.' त्याने म्हटलंय 'मी केवळ हे सांगू इच्छितो की मी सारासोबत लग्न केलं होतं आणि ती जगासमोर खोटं बोलतेय की ती सिंगल आहे.' 

सारा गुरपाल

सारा गुरपाल

पंजाबची गायिका सारा गुरपाल 'बिग बॉस'च्या घरात स्वतः सिंगल असल्याचं सांगतेय. तर दुसरीकडे गायक तुषार कुमारने त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आणि सारासोबतचे फोटो दाखवत सिद्ध करतोय की तो आणि सारा पती-पत्नी आहेत. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये त्याच्या पत्नीचं नाव रचना देवी असल्याचं दिसतंय.मात्र फोटोंमध्ये तो सारासोबत दिसून येतोय. यात साराच्या हातात नववधुचा लाल चुडा आणि डोक्यात सिंदूर देखील दिसतोय. तुषारने म्हटलंय की 'मला असं वाटतं माझ्याकडून प्रसिद्धी आणि अमेरिकेत नागरिकत्व मिळवण्यासाठी तिने माझ्याशी लग्न केलं होतं. तिने मला सोडलं कारण माझ्याकडून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मिळाली नाही.' 

 

bigg boss 14 punjabi singer tushar kumar clamis being marriage to sara gurpal  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 punjabi singer tushar kumar clamis being marriage to sara gurpal