'बिग बॉस १४' मधून 'या' स्पर्धकाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता, प्रेक्षकही गोंधळात

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 4 January 2021

कित्येक युजर्सनी 'बिग बॉस'चा हा निर्णय चूकीचं असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई- 'बिग बॉस १४' च्या यंदाच्या विकेंड वारमध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांना खडे बोल सुनावले. रविवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये सलमानने सांगितलं की विकास गुप्ता आणि राखी सावंत सुरक्षित आहेत. राखी प्रेक्षकांच्या भरगोस मतांमुळे सुरक्षित असल्याचं सलमानने स्पष्ट केलं होतं.  तेव्हा आता इतर स्पर्धकांवर टांगती तलवार होती कारण यावेळी घरातील सगळे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणता स्पर्धक यावेळी घराबाहेर पडणार आहे. 

हे ही वाचा:  कतरिना कैफने चुकून पोस्ट केला विकी कौशलसोबतचा फोटो, मग लगेचच केला डिलीट  

'बिग बॉस'च्या घरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा मोहोल पाहायला मिळाला. त्यामुळे रविवारी कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेर केलं गेलं नाही. मात्र सोमवारी टेलिकास्ट होणा-या एपिसोडमध्ये स्पर्धक घरातून बाहेर होताना दिसेल. 'द खबरी'च्या रिपोर्टनुसार, राहुल महाजन यावेळी बेघर होणार आहे. राहुल या आठवड्यात कॅप्टन बनला होता त्यामुळे तो बेघर झाल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  

अर्शी खान, राहुल महाजन, सोनाली फोगाट

कित्येक युजर्सनी 'बिग बॉस'चा हा निर्णय चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. युजर्सचं म्हणणं आहे की सोनाली फोगाट घरात काहीच करताना दिसत नाहीये याउलट राहुल महाजन चांगला गेम खेळत आहे. तर एका युजरने म्हटलं की सोनाली फोगाटचं वाहिनीसोबत काही करार झाला आहे का? कमी मतं असूनही त्या घरात आहेत. प्रेक्षकांच्या मतांची काहीच किंमत नाही? 

राखी सावंत आणि राहुल महाजन यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झालं होतं. त्यांचं हे भांडण पाहून दोघांची मैत्री पहिल्या सारखी राहिली नसल्याचं दिसतंय. या भांडणामध्ये राहुलने राखीला वाईट शब्दात सुनावलं होतं जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं नसल्याचं म्हटलं जातंय.  राहुल आणि राखी यांची काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये एंट्री झाली होती. हे दोघंही बिग बॉस चॅलेंजर्स म्हणून आले आहेत. राखी आणि राहुल व्यतिरिक्त अर्शी खान, विकास गुप्ता, मनु पंजाबी देखील या शोमध्ये आले आहेत. यातील मनू पंजाबीला तब्येतीच्या काही कारणांमुळे शो पासून लांब ठेवण्यात आलं होतं.   

bigg boss 14 rahul mahajan evicted from the house as per reports  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 rahul mahajan evicted from the house as per reports