बिग बॉस ड्रामा: राखी सावंतने फाडले राहुलचे कपडे, 'हेच जर महिलेच्या बाबतीत...' अली गोनीचा सवाल

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 31 December 2020

राखी बदला घेण्यासाठी सगळ्यांना त्रास देत होती. यादरम्यान राखी राहुल महाजनचं धोतर फाडते. त्यानंतर अली गोनीला संताप अनावर होतो आणि तो हा मुद्दा उचलून धरतो.

मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये राखी सावंत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कधी जुली बनुन तर कधी कधी तिच्या मजेशीर स्वभावाने ती सगळ्यांचं मनोरंजन करत असते. मात्र मंगळवारच्या एपिसोडमध्ये राखी सावंत जखमी झाली. तिच्या नाकावर मार लागला ज्यामुळे तिने ढसाढसा रडायला लागली. तिने डायनिंग टेबलवर तिचं डोकं आपटायला सुरुवात केली तेव्हा काहींनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा: नाट्यरसिकांसाठी नव्या वर्षात पर्वणी, 'या' कलाकृती पुन्हा रसिकांसाठी होणार सादर  

त्याचं झालं असं की जॅस्मिन भसीनने रागात राखीला तिला डक फेस घातलं होतं ज्यामुळे राखीच्या नाकावर मार लागला. त्यानंतर बिग बॉसने जॅस्मिनची तीव्र शब्दात निंदा केली. मात्र राखी सावंतवर बदल्याचं भूत चढलं आहे. ती बदला घेण्यासाठी सगळ्यांना त्रास देत होती. यादरम्यान राखी राहुल महाजनचं धोतर फाडते. त्यानंतर अली गोनीला संताप अनावर होतो आणि तो हा मुद्दा उचलून धरतो.

Mumbai News Network Latest News: Bigg Boss 14 Synopsis | Day 73

राखी जॅस्मिनला कॅप्टन न बनवण्यासाठी प्रयत्न करते आणि ती तिच्या आवतारात सगळ्यांना त्रास देते. त्यानंतर ती राहुलचं धोतर फाडते. जे पारून सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण तिला असं करु नको हेच बजावत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या सगळ्या प्रकरणावर आधीच राखीसोबत पंगा घेतलेला अली गोनी आणखीनंच चिडतो. तो हा मुद्दा उचलून धरतो आणि यावर हरकत घेतो. तो म्हणतो 'या अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. हेच जर कोणा महिलेसोबत झालं असतं तर चाललं असतं का? हे टास्क होणार नाही.' आता हे बघणं महत्वाचं असेल की बिग बॉस यावर काय ऍक्शन घेत आहेत तसंच लोकांमध्ये याविषयी काय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर घरातील स्पर्धक यावेळी विकेंडच्या वारची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत कारण यावेळी घरात अशा ब-याच गोष्टी घडल्या आहेत ज्यावर आता शोचा होस्ट सलमान खान कोणाची कशी खरडपट्टी काढतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.     

bigg boss 14 rakhi sawant tear rahul mahajan cloth aly goni objects  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 rakhi sawant tear rahul mahajan cloth aly goni objects