Bigg Boss 15: ग्रँड फिनालेमधून दोन स्पर्धक बाहेर, सलमानही शॉक

Bigg Boss 15: टीव्ही मनोरंजनच्या (Tv Entertainment) जगतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 15 व्या सीझनची (Bigg Boss 15) आता सांगता होणार आहे.
bigg boss season 15
bigg boss season 15 Team esakal

Bigg Boss 15: टीव्ही मनोरंजनच्या (Tv Entertainment) जगतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 15 व्या सीझनची (Bigg Boss 15) आता सांगता होणार आहे. ग्रँड फिनालेमधून दोन स्पर्धक बाहेर पडल्याचा खुलासा या शोचा होस्ट सलमान खाननं (Salman Khan) केला आहे. मात्र जेव्हा त्या स्पर्धकांची नावं समोर आली तेव्हा त्यालाही धक्का बसल्याचे दिसुन आले आहे. त्यानं सांगितलं आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये आता डबल एलिमिनेशन होणार आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 10 सदस्य आहेत. त्यामध्ये तीन सदस्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

बिग बॉसच्या 15 व्या सीझनचा ग्रँड फिनाले (Bigg Boss Grand Finale) आता जवळ आला आहे. त्यातील काही स्पर्धकांचे एलिमिनेशन झाले आहे. त्यामध्ये देवोलिना भट्टाचार्य, रश्मि देसाई आणि अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घराबाहेर जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिकिट टू फिनालेच्या टास्कमध्ये रश्मि देसाई आणि देवोलिना यांच्यात मोठी वादावादी झाली होती. त्यांच्यातील वाद एवढा टोकाला गेला की त्यांच्यात बिग बॉसला दखल घ्यावी लागली होती. सोशल मीडियावर देखील त्यांच्यातील वाद समोर आला होता. बिग बॉसचा होस्ट सलमान खाननं त्या दोन्ही स्पर्धकांची दखल घ्यावी लागली होती. त्यावेळी त्यानं आता बिग बॉसच्या घरामध्ये एलिमिनेशन होणार असल्याचे सांगितले होते.

bigg boss season 15
Bigg Boss 15: पाणी समजून तेलच प्यायली अफसाना...

आता बिग बॉसच्या घरात 7 स्पर्धकांना फिनालेमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर आणि आणखी तीन स्पर्धक देखील त्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देवोलिनाला घराबाहेर काढण्यात येणार आहे. याशिवाय तिची जिच्यासोबत कडाक्याची भांडणं झाली होती त्या रश्मि देसाईवर बिग बॉस नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. राजीव अदातलिया देखील घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

bigg boss season 15
Zombiewali Movie l मराठीतला पहिलाच 'झोम्बीपट' प्रेक्षकांना भावणार? |पाहा व्हिडीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com