Shalin Bhanot: बिग बॉसच्या घरात प्रेमाचे नको ते चाळे करणारा शालीन भनोट म्हणतोय,'आता मी आयुष्यभर..' Bigg Boss 16 Contestant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shalin Bhanot

Shalin Bhanot: बिग बॉसच्या घरात प्रेमाचे नको ते चाळे करणारा शालीन भनोट म्हणतोय,'आता मी आयुष्यभर..'

Bigg Boss 16 Shalin Bhanot: टी.व्ही अभिनेता शालीन भनोट बिग बॉस १६ मुळे भलताच चर्चेत आला. माहितीसाठी इथं सांगतो की, शालीन भनोटनं बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा अवलंब करुन टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. पण,प्रेक्षकांचं वोटिंग कमी मिळाल्यानं त्याला फिनालेच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडावं लागलं आणि एम सी स्टॅननं ट्रॉफी पटकावली.

पण इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर शालीन भनोटनं मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे जो तो हैराण झाला आहे. शालीननं शो चा होस्ट सलमान खानच्या समोर आयुष्यभर सिंगल राहण्याची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया अखेर शालीननं इतका मोठा निर्णय का घेतला? (Bigg Boss 16 contestant shalin bhanot decided to be single)

बिग बॉस १६ मध्ये शालीन भनोट आणि टीना दत्ताच्या प्रेमाला चांगलाच बहर आलेला आपण सर्वांनी पाहिला. दोघांनीही आपल्या लव्ह अॅंगलच्या मदतीनं प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वळवले.

तसं दोघेही आम्ही फक्त मित्र आहोत असं म्हणायचे,पण त्यांच्यात जी जवळीक होती ती मात्र मैत्रीपलिकडची होती. शालीननं बजर वाजवला नाही म्हणून टीनाला घराबाहेर पडावं लागलं आणि तिथून त्यांचं नातं टोटल बदललं.

अर्थात शालीननं २५ लाखाचं नुकसान सहन करत टीनाला परत बोलावलं खरं..पण त्यानंतर त्यांचं नातं मात्र पहिल्याासारखं राहिलं नाही.

टीना खूप वेळा त्याला टोमणे मारताना दिसली. त्याच्याशी भांडण करायची आणि मग पुन्हा मैत्रीचा हात पुढे करायची. एके दिवशी 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खाननं टीनाची पोल खोल केली आणि पूर्ण जगासमोर सांगितलं की शालीन नाही तर टीना त्याच्याशी गेम खेळतेय.

शालीन भनोटनं २००९ मध्ये टी.व्ही अभिनेत्री दलजीत कौरसोबत लग्न केलं होतं. दोघांचं नात फार वर्ष काही टिकलं नाही आणि २०१५ मध्ये ते विभक्त झाले. तेव्हापासून शालीन सिंगल आहे.

शालीन जेव्हा बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी शर्थीनं लढत होता तेव्हा बातमी समोर आली होती की त्याची एक्स वाइफ दलजीत कौर लवकरच दुसरं लग्न करत आहे. ती आपल्या मुलासोबत केनिया शिफ्ट होण्याची तयारी करत आहे.

शालीननं बिग बॉसच्या फिनालेत सलमान खान समोर आपण आजन्म सिंगल राहणार असलेल्या आपल्या निर्णयाची घोषणा केली.

तो म्हणाला, ''मी नेहमीच सलमान खानला माझं इन्स्पिरेशन मानलं आहे. त्याच्यासारखाच मला अभिनय करायचा असायचा आणि आता त्याच्यासारखंच सिंगल आयुष्य मला यापुढे जगायचं आहे''.

टीनानं विश्वासघात केला म्हणून शालीननं हा निर्णय घेतला की एक्स वाईफ लग्न करतेय म्हणून तो या निर्णया पर्यंत पोहोचला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते मात्र चिंतेत पडलेयत.