Abdu Rozik: छोटा भाईजान अब्दू अजूनही भारतातच.. दिल्लीतील हजरत निझाम दर्ग्यात नमाज पठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abdu rozik, abdu rozik news, abdu rozik hotel, abdu rozik family, bigg boss 16, abdu and shiv

Abdu Rozik: छोटा भाईजान अब्दू अजूनही भारतातच.. दिल्लीतील हजरत निझाम दर्ग्यात नमाज पठण

Abdu Rozik News: छोटा भाईजान अब्दू बिग बॉस १६ (Bigg Boss 16) मुळे चर्चेत आला. बिग बॉस १६ मधून अब्दू रोझीक प्रचंड लोकप्रिय झाला. अब्दू आणि शिवची खास मैत्री सुद्धा चर्चेत राहिली.

अब्दू अजूनही भारतात असून तो लवकरच त्याच्या मायदेशी म्हणजेच कझाकिस्तानाला परत जाणार आहे. अब्दू भारतात सध्या राहण्याची पूर्ण मजा घेतोय. तो बिग बॉस मधल्या मित्रांसोबत मजेत वेळ घालवत आहे. नुकतंच अब्दूने खास गोष्ट केली जी चर्चेत आहे.

(bigg boss 16 fame Abdu rozik visit Hazrat Nizam Dargah in Delhi)

अब्दू दिल्लीतील प्रसिद्ध अशा हजरत निजामुद्दीन दर्ग्यात गेला होता. तिथे अब्दूने मनोभावे नमाज पठण केलं. अब्दूचे दर्ग्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोत अब्दूला पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सची गर्दी दिसतेय. शिवाय अब्दू खास सफेद रंगाचा कुरता, डोक्यावर काळी टोपी, अंगावर शाल अशा खास गेटअपमध्ये दिसून आला.

बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यावर अब्दू रोजिकने भारतात पहिले रेस्टॉरंट उघडण्याची घोषणा केली आहे. एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर अब्दू रोजिकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अब्दू मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे. व्हिडिओमध्ये पापाराझींशी बोलताना अब्दू रोजिक सांगतो की, तो लवकरच भारतात आपले रेस्टॉरंट उघडणार आहे.

व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘मी लवकरच भारतात माझे रेस्टॉरंट उघडणार आहे. मी 6 मार्च रोजी भारतात परत येईन आणि मुंबईत माझे रेस्टॉरंट उघडणार आहे. असं अब्दू म्हणाला.

अब्दू रोजिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस 16 मध्ये अब्दू रोजिक, साजिद खानची, शिव ठाकरेची मैत्री खूप गाजली होती. अब्दू रोजिक घराबाहेर गेल्यावर साजिद - शिव खूप रडले होते.

बिग बॉस १६ संपल्यावर अब्दू रोझीक त्याच्या मंडलीसोबत एकत्र धम्माल करताना दिसला. आता अब्दू मुंबईत स्वतःचं हॉटेल उघडत असल्याने सर्वांनाच आनंद झालाय.

टॅग्स :Big Boss