Shiv Thakare: शिव सोबत एक सेल्फी घेण्यासाठी फॅन्समध्ये धक्काबुक्की, व्हिडिओ वायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv thakare, shiv thakare news, shiv thakare fans, shiv thakare video

Shiv Thakare: शिव सोबत एक सेल्फी घेण्यासाठी फॅन्समध्ये धक्काबुक्की, व्हिडिओ वायरल

Shiv Thakare News: 'बिग बॉस 16' मध्ये टॉप २ पर्यंत मजल मारलेला स्पर्धक म्हणजे मराठमोळा शिव ठाकरे. बिग बॉस संपला असला तरीही शिवच्या फॅन्समध्ये त्याची क्रेझ कायम आहे.

शिव ठाकरेचा लेटेस्ट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत शिवची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी त्याच्या फॅन्समध्ये धक्काबुक्की झालीय.

(bigg boss 16 fame shiv thakare get mobbed by fans video viral)

शिव ठाकरे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिव एका इव्हेंटला गेला असून या व्हिडिओमध्ये शिव ठाकरेच्या मागे गर्दी दिसत आहे.

अचानक काही फॅन त्याच्या समोर येतात. बाऊन्सरचं सुरक्षा कवच तोडून फॅन्स शिव सोबत सेल्फी काढण्यात धडपडतात. फॅन्समध्ये धक्काबुकी झालेली दिसते.

अगदी फॅन्समध्ये हाणामारीही होते. पण शिव ठाकरेसोबत असलेल्या बाऊन्सर्सनी ही परिस्थिती पटकन नियंत्रणात आणली. यानंतर हे बाउन्सर शिवसोबत सुखरूप निघताना दिसत आहेत.

शिव ठाकरे सर्व फॅन्सना स्माईल देत हे स्वागत स्वीकारताना दिसतोय. समोर असलेले फॅन्स नियंत्रणाबाहेर गेले असले तरीही शिव प्रसंगावधान राखत फॅन्सचं प्रेम स्वीकारत आहे.

शिवच्या या व्हिडिओवर फॅन्सनी त्याचं कौतुक केलंय. "तुच खरा बाजीगर.." असं म्हणत फॅन्सनी शिवच्या प्रचंड फॅन फॉलोईंगचं कौतुक केलंय. बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने लाखो रुपयांची कार खरेदी केली होती, त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच वेळी, आता त्याने आपला नवीन व्यवसाय सुरू केला आहे. होय, शिवने मुंबईत 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे.

त्यानी हसलर हॉस्पिटॅलिटीशी कोलॅबरेट केलं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीसोबत अब्दु रोझिकने मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंटही उघडले आहे, जे 'बर्गर' सर्व्ह करते.