Shiv Thakare: भल्या मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट काढून जिचे सिनेमे पाहिलेत आता ती.. शिव ठाकरेची नुसती हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare, Shiv Thakare news, Shiv Thakare meets madhuri dixit, shiv thakare kkk 13,

Shiv Thakare: भल्या मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट काढून जिचे सिनेमे पाहिलेत आता ती.. शिव ठाकरेची नुसती हवा

Shiv Thakare meets Madhuri Dixit News: बिग बॉस १६ जरी संपलं असलं तरीही शिव ठाकरेची हवा मात्र ओसरली नाही. शिव ठाकरे बिग बॉस नंतर सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

शिव ठाकरे 'बिग बॉस 16' या रिअॅलिटी शो जिंकू शकला नाही मात्र त्याच्या मनमोकळ्या स्वभावाने लोकांची मने मात्र नक्कीच जिंकली. 

शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या खतरों के खिलाडी 13 सह टेलिव्हिजनवर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस १६ जरी संपलं असलं तरीही शिव ठाकरेची हवा मात्र ओसरली नाही.

शिव ठाकरे बिग बॉस नंतर सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिव ठाकरेच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे त्यामुळे त्याच्या आनंदाला उधाण आलंय.

(bigg boss 16 fame shiv thakare meet madhuri dixit his dreams come true)

शिव ठाकरेला माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘People’s Choice Reality TV Star’ हा पुरस्कार मिळाला. यामुळे शिव ठाकरे भारावून गेलाय. शिव ठाकरेने फोटो पोस्ट करून त्याच्या भावना व्यक्त केल्यात..

शिव लिहितो.."माधुरी दीक्षितच्या चित्रपटासाठी तिकीटाच्या रांगेत उभे राहण्यापासून....तिच्याकडून ‘पीपल्स चॉईस रिअॅलिटी टीव्ही स्टार’ पुरस्कार मिळवण्यापर्यंत!! स्वप्न खरी होतात..." अशा भावना शिव ठाकरेने व्यक्त केल्यात.

आता शिव खतरों के खिलाडी 13 साठी सज्ज झाला असुन त्याचा प्रवास देखील सुरु झाला आहे. मात्र त्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यात शिवची आई त्याचे औक्षण करत आहे.

शिव आता आईचा आशीर्वाद घेवुन खतरों के खिलाडीचा 13 वा सिझन गाजवण्यासाठी निघाला आहे. त्याच्या चाहत्यांना तर पुर्णपणे विश्वास आहे की शिव हा शो नक्कीच जिंकेल.

टॅग्स :Shiv Thakare