'तू ४० लाख घेऊन बाहेर पड!' एमसी स्टॅनला कुणी दिला सल्ला?| Bigg Boss 16 Finale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Finale

Bigg Boss 16 Finale : 'तू ४० लाख घेऊन बाहेर पड!' एमसी स्टॅनला कुणी दिला सल्ला?

Bigg Boss 16 Grand Finale rakhi sawant MC Stan : आपल्या पर्सनल लाईफशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींमुळे बिग बॉसमधील स्पर्धक एमसी स्टॅन चर्चेत असतो. भलेही त्याचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. मात्र त्याला बिग बॉसमध्ये म्हणावी अशी चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे त्याला एखादं मॅजिकचं वाचवू शकतं. अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. एमसी स्टॅनला त्याच्या वाचाळपणाचा फटका बसू शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ड्रामा क्वीन राखी सावंतनं आता एमसी स्टॅनला मोलाचा सल्ला दिला आहे. राखीनं बिग बॉसच्या फिनालेपूर्वी काही गोष्टींबाबत तिची मतं व्यक्त केली आहेत. ज्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी ही तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आली आहे. लग्नाला महिनाही होत नाही तोच तिच्या पतीनं आदिलनं तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राखीवर मोठं संकट कोसळलं आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

बिग बॉसची एक्स कंटेस्टंट असणाऱ्या राखीनं आता एमसी स्टॅनला दिलेल्या सल्ल्यानं सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. राखी स्टॅनला म्हणते की, तू ४० लाखांची बॅग घेऊन जा, मला तर असे वाटते की, स्टॅननं ती बॅग घेऊन पळून जावं. राखी म्हणते, माझ्या लेखी प्रियंका, शिव आणि शालिन हे बिग बॉसचे विजेते आहेत. ही तीन लोकं बिग बॉसच्या अंतिम तीनमध्ये असणार आहेत.

बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये राखी ही शेवट्च्या तीन स्पर्धकांमध्ये होती. यावेळी तिनं १४ लाख रुपयांची बॅग घेऊन जाणं पसंत केलं होत. तेव्हा माझ्या आईला बरं नाही, तिच्या उपचारासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे तिनं सांगितले होते. राखीनं बिग बॉसचा गेला सीझन तिच्या वेगवेगळ्या करामतींमुळे गाजवला होता. त्याची चर्चाही खूप झाली होती.