
Shalin Bhanot : 'देव तिचं'....पहिल्या पत्नीच्या लग्नाबद्दल ऐकताच शालीन भानोत हैराण
बिग बॉस 16 मध्ये 19 आठवडे घालवल्यानंतर टीव्ही अभिनेता शालीन भानोट बाहेर आला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शालीनला धक्कादायक बातमी मिळाली. त्याची माजी पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
दलजीतने अलीकडेच तिच्या एंगेजमेंटची बातमी शेअर केली होती. तिने सांगितले होते की मार्च 2023 मध्ये ती निखिल पटेलसोबत लग्न करेल आणि केनियाला शिफ्ट होईल. आता शालीनने याबद्दल बोलले आहे.
एका मुलाखतीत शालीन भानोतला विचारण्यात आले की, त्याची माजी पत्नी दलजीत कौरच्या लग्नाबद्दल त्याला काय म्हणायचे आहे? त्याने उत्तर दिले, "मला काहीच माहीत नाही. त्यामुळे मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही. मी आत्ताच बाहेर आलो आहे".
"मला आत्ताच याबद्दल माहिती होत आहे. वीकेंडच्या एका एपिसोडमध्ये सलमान खान सरांनी याबद्दल काही बोलले होते याशिवाय मला काहीच माहीत नाही. मला असे म्हणायचे आहे की देव तिचं भलं करो".
गेल्या महिन्यात दलजीत कौरने बिझनेसमन निखिल पटेलसोबत लग्नाची घोषणा केली होती. दलजीतने सांगितले होते की लग्नानंतर ती पती आणि मुलासोबत केनियाला शिफ्ट होईल. ती असेही म्हणते की ती मुलगा जेडनला त्याचे वडील शालीनला भेटण्यासाठी भारतात आणेल. निखिल आणि दलजीत मार्चमध्ये लग्न करणार आहेत.
दलजीत आणि शालीनच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर ते दोघे 2006 मध्ये भेटले होते. दोघेही 'कुलवधू' या मालिकेत एकत्र काम करत होते. तीन वर्षांनंतर 2009 मध्ये शालीन आणि दलजीतचे लग्न झाले.
2015 साली दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. याच्या वर्षभरापूर्वी दोघांनी त्यांच्या पहिल्या अपत्या जेडनचे जगात स्वागत केले होते.
बिग बॉस 16 मधील शालीन भानोतच्या प्रवासात दलजीत कौरने खूप साथ दिली. एका एपिसोडमध्ये, शालीनला त्याच्या कुटुंबाकडून मिळालेले पत्र वाचून रडू कोसळले. या एपिसोडचा व्हिडिओ दलजीतने सोशल मीडियावर शेअर केला आहे.