
Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस 16 ची ट्रॉफी सोन्याची की हिऱ्यांची! किंमत ऐकून बसेल धक्का...
Bigg Boss 16 Trophy: बिग बॉसच्या 16व्या सिजनचे आता फक्त काही तासच शिल्लक आहे. ग्रँड फिनालेनंतर आज बिग बॉसच्या 16व्या पर्वाला त्याचा विजेता मिळणार आहे. या सीझन बराच गाजला.
मग ते अर्चनाला मध्यरात्री घरातुन काढून टाकणं असो, सूबुंलचं प्रकरण, शालिन आणि टिनाचं नाटकं, प्रियंका आणि अंकितचं प्रेम.. त्याचबरोबर शोमध्ये एमसी स्टॅनचे राडे आणि साजिद खानचे शोच्या बाहेरच प्रकरण आणि शिवचं घरातील सर्व सदस्यांना जीव लावणं. त्यामुळे हा सिझन चर्चेत होता.
याशो मध्ये घराची रचनाही सर्व सीझनपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. हा शो खूप खास आणि तितकाच वेगळा असल्याने यावेळी निर्मात्यांनी शोची ट्रॉफीही खूप वेगळी बनवली आहे. बिग बॉस सीझन 16 मध्ये घोड्याच नाव वारंवार घेतले जात गेले अंकित गुप्ताच्या झोपण्याच्या जागेसाठी घरातील घोड्याचाच वापरल जास्त केला.

खरे तर तो शोमध्ये असताना बिग बॉसच्या घरात बनवलेल्या घोड्याखाली झोपण्यात अंकित गुप्ताचा जास्त वेळ जात असे. त्याच वेळी, शोच्या निर्मात्यांनी सीझन 16 ची ट्रॉफी देखील उघड केली आहे. ही ट्रॉफीही घोड्याच्या आकारात बनवली आहे. मात्र, ही ट्रॉफी काही सामान्य ट्रॉफी नाही. निर्मात्यांनी खूप विचार करून ही ट्रॉफी बनवली आहे. ही ट्रॉफी खूप खास आहे. या ट्रॉफीमध्ये गोल्ड आणि हिऱ्यांचे काम करण्यात आले आहे.

घोड्याच्या डोक्याच्या आकाराची ही ट्रॉफी खूपच स्टायलिश आणि अनोखी आहे. शोच्या ट्रॉफीच्या किंमतही तितकीच चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरे आणि सोन्याने बनवलेल्या या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे. म्हणजे सुमारे 10 लाख आहे. ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुरेख काम करण्यात आले आहे. त्याच वेळी, त्यावर बिग बॉसचा लोगो म्हणजेच डोळा देखील दिसतो आहे. यावर्षी जो या शोचा विजेता होईल त्याला ही अतिशय खास चमकणारी ट्रॉफी मिळणार आहे.