Bigg Boss 16: माझ्यामुळे शिवला ट्रॉफी नाही जिंकता आली... एम. सी. स्टॅनला झालंय खुप दुःख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mc stan, shiv thakare, bigg boss 16

Bigg Boss 16: माझ्यामुळे शिवला ट्रॉफी नाही जिंकता आली... एम. सी. स्टॅनला झालंय खुप दुःख

Bigg Boss 16 MC Stan on Shiv Thakare: बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले काल पार पाडली. ग्रँड फिनालेची ट्रॉफी एम. सी. स्टॅनने जिंकली. एम. सी. स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये आणि हुंडाई गाडी बक्षीस स्वरूपात मिळाली.

एम.सी. स्टॅन विजेता झाला तर बिग बॉस १६च्या ग्रँड फिनालेमध्ये मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता ठरला. शिव ठाकरे बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर असं सर्वांना वाटत होतं.

पण शिवला उपविजेतेपद मिळालं. आणि त्याच्या सर्व फॅन्सची निराशा झाली. शिवला उपविजेतेपद मिळाल्याने स्वतः एम. सी. स्टॅन सुद्धा नाराज झालाय.

एका मुलाखतीत एम. सी. स्टॅनने शिव जिंकला नाही म्हणून वाईट वाटतंय असं बोलून दाखवलं आहे. एम. सी. स्टॅन म्हणाला,"खूप छान वाटतंय. पण शिवसाठी खूप वाईट वाटतंय.." स्टॅन पुढे म्हणाला.. "शिव समजून घेईलचं. त्याने समजून घेतलं आहे. पण तो आता माझ्याजागी असायला पाहिजे होता.

बिग बॉसची ट्रॉफी जिंकण हे त्याच्यासाठी स्वप्न होतं. त्यामुळे त्याच्यासाठी खूप वाईट वाटतंय. व्होटिंग दोघांना पण होते. पण ते वोट clash झाले असावेत. माझे फॅन हार्ड आहेत त्याचे पण कट्टर आहेत. आता काय बोलू मी.." अशा शब्दात स्टॅनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

शिव ठाकरे आणि मंडलीवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. शिव, स्टॅन, सुम्बुल, साजिद, निम्रीत, अब्दू असे सहा जण मंडलीचा हिस्सा होते. इतकंच नव्हे या सहा जणांनी हक से मंडली असं जॅकेट ग्रँड फिनालेला परिधान करून स्पेशल डान्स केला.

मंडलीपैकी स्टॅन आणि शिव टॉप ५ मध्ये होते. त्यामुळे स्टॅन आणि शिव दोघेही फायनलमध्ये टॉप २ हवेत अशी मंडलीची इच्छा होती. ती इच्छा अखेर पूर्ण झालीच आणि इतकंच नव्हे तर मंडली मधील एम.सी.स्टॅन विजयी झाला.

स्टॅन जिंकल्याचा जास्त आनंद शिवला देखील झाला. जेव्हा स्टॅनचं नाव विजेता म्हणून पुकारण्यात आलं तेव्हा शिवने स्टॅनला खांद्यावर उचलून घेतलं. मित्रांसाठी शिवच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. त्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतंय

टॅग्स :Big BossShiv Thakare