Bigg Boss 17: सलमान खानचं वेगळं रुप, बिग बॉस 17 चा नवीन प्रोमो भेटीला, या महिन्यात होणार खेळ सुरु? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss 17 promo out salman khan in colors tv started in october

Bigg Boss 17: सलमान खानचं वेगळं रुप, बिग बॉस 17 चा नवीन प्रोमो भेटीला, या महिन्यात होणार खेळ सुरु?

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानच्या बिग बॉस 17 व्या सिझनची सर्वांना उत्सुकता होती. बिग बॉस 17 वा सिझन कधी सुरू होणार? याची फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. काहीच दिवसांपूर्वी बिग बॉस ott 2 संपला. एल्विश यादव विजेता ठरला. आता बिग बॉस 17 वा सिझनची उत्कंठा शिगेला आहे. कारण बिग बॉस 17 चा सलमान खानचा पहिला प्रोमो भेटीला आलाय.

बिग बॉस 17 च्या प्रोमोत बघायला मिळतं की सलमान खान पुन्हा एकदा दमदार अंदाजात दिसतोय. यावेळी तो एकामागोमाग एक दरवाजे उघडतो आणि त्याची वेशभूषा बदलते. सलमान खानचे तीन विविध लूक दिसतात. शेवटी सलमान खान बिग बॉस 17 ची घोषणा त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो. अजून तारीख समोर आली नसली तरी या पहिल्याच दमदार प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय.

बिग बॉस 17 कधी सुरु होणार?

बिग बॉस 17 चा नवीन प्रोमो काल भेटीला आला. या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अजुन बिग बॉस 17 ची नवीन रिलीज डेट अजुन समोर आली नसली तरीही हा सीझन ऑक्टोबर मध्ये सुरु होणार असल्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा सुपरस्टार सलमान खान बिग बॉस 17 चं सुत्रसंचालन करणार आहे. मागच्या सीझनप्रमाणे यंदाही सलमान खान बिग बॉस 17 चं त्याच्या खास शैलात निवेदन करणार, असं दिसतंय.