बिग बॉसच्या घरात कोण होणार लॉक? 'बिग बॉस 17'चा धमाकेदार प्रोमो व्हायरल! Bigg Boss 17 Promo | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 17 Promo

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात कोण होणार लॉक? 'बिग बॉस 17'चा धमाकेदार प्रोमो व्हायरल!

Bigg Boss 17 Promo: बिग बॉस ओटीटीवरचा दुसरा सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे. ती टिव्हीवरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस' ची. यंदा बिग बॉसचा 17 वा सीझन आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची लोकप्रियता खुप मोठ्या प्रमाणात आहे. यात प्रेक्षकांना मनोरंजन, ड्रामा , वादविवाद सर्वच पहायला मिळते.

आता सलमान खानने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. त्या व्हिडिओमध्ये सलमान तीन वेगवेगळ्या रुपात दिसत आहे. शोच्या तीन नवीन प्रोमोमध्ये भाईजान चाहत्यांना आपल्या अनोख्या आणि रंजक लूकमध्ये या शोबद्दल बोलतोय.

व्हिडिओ शेअर करताना ‘यावेळी प्रेमाची परीक्षा होईल, काही जिंकतील आणि काही हरतील’, असे कॅप्शन लिहिले आहे. प्रोमोमध्ये सलमान म्हणत आहे की बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना प्रेमाच्या काही कठीण परीक्षा द्याव्या लागतील. तर बिग बॉसने त्याला सांगतो की यावेळी घरात त्यांचे काही आवडते स्पर्धक असतील.

तर दुसऱ्या प्रोमोमध्ये सलमान खान डिटेक्टिव्ह स्टाईलमध्ये दिसतोय. तर तिसऱ्या प्रोमोत सलमान बॉम्ब शोध पथकाच्या सदस्याच्या वेशात दिसतोय.

बिग बॉस 17 चा ग्रँड प्रीमियर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवार रात्री 9 वाजता कलर्स टीव्ही वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर शो 24 तास लाइव्ह पाहू शकता.

तर घरातील स्पर्धकांबद्दल बोलायचं झालं तर अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिकसोबतच बऱ्याच नावांची चर्चा आहे. आता हा शो प्रेक्षकांच्या किती पसंती पडेल हे पहावे लागेल.