Bigg Boss महजबी बुरखा घालून जीममध्ये, नेटकऱ्यांनी झापलं: 'अगं तुला...'

कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरण अजुन शांत झालेलं नाही. त्याचे (Entertainment News) पडसाद देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये उमटल्याचे दिसून आले आहे.
Mehjabi Siddhqui
Mehjabi Siddhquiesakal

Hijab Row : कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरण अजुन शांत झालेलं नाही. त्याचे (Entertainment News) पडसाद देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये उमटल्याचे दिसून आले आहे. आता बिग बॉस फेम महजबी सिद्धिकीनं (Actress Mehjabi Siddhqui) बुरखा घालून जीममधील व्हिडिओ व्हायरल (Viral news) केला आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच तिला नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील हिजाब प्रकरण हे चांगलचं चर्चेत आलं आहे. त्यावर न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला वरिष्ठ कोर्टामध्ये आव्हान देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील वेगवेगळ्या नेत्यांनी या हिजाब प्रकरणाला कडाडून विरोध केला आहे. आता बिग बॉस फेम महजबी सिद्धिकी तिच्या बुरखा प्रकरणानं चर्चेत आली आहे.

महजबीनं (Mehjabi Siddiqui) सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांना असे आवाहन केले होते की, मी आता अल्लाच्या नावानं पूर्ण आयुष्य त्याच्या सेवेसाठी खर्च करणार आहे. मी माझ्याकडून ज्या चूका झाल्या आहेत त्या सुधारण्यासाठी, त्यातून माझे पापक्षालन व्हावं या उद्देशानं मी हे करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितलं आहे. महजबीनं जेव्हा तिचा हा निर्णय नेटकऱ्यांना सोशल मीडियाच्या आधारे सांगितला तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. ग्लॅमरच्या दुनियेला रामराम करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. मात्र आताचा तिचा जो व्हिडिओ आहे त्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे.

Mehjabi Siddhqui
Viral Video : आईने वापरली ट्रिक; रडणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आले लगेच हसू

त्या व्हिडिओमध्ये महजबीनं बुरखा परिधान केला आहे आणि ती जिममध्ये गेली आहे. हातात डंबेल्स घेऊन तिनं कसरत केली आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. महजबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर एका नेटकऱ्यानं तिला कमेंट केली आहे. तुला नेल पॉलिशही आता आवडत नसेल तेव्बा तू ते देखील टाळलं असशील. दुसरीकडे अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारे कमेंटस देऊन ट्रोलही केले आहे. जर तुला काही काम करायचे असेल तर ते बिनधास्तपणे कर. त्यासाठी बुरख्याची बदनामी करु नको. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील तिला मिळाल्या आहेत.

Mehjabi Siddhqui
Video: तापमान वाढीमुळे उन्हाच्या झळा असह्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com