'बिग बॉस' फेम अभिनेत्री सना खानने इस्लामचं कारण देत फिल्म इंडस्ट्री मधून घेतली एक्झिट

sana khan
sana khan

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि बिग बॉस ६ ची स्पर्धक सना खानने सिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सनाने तिच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. इस्लामचं कारण देत तिने सिने इंडस्ट्री सोडत असल्याचं म्हटलंय. सना सांगते की तिला माणुसकीची सेवा करायची आहे आणि ती आत्तापासून अल्लाच्या आदेशांचं पालन करणार आहे. 

अभिनेत्री सना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोम, इंग्रजी आणि अरबी  अशा तीन भाषांमध्ये पोस्ट केली आहे. सनाने लिहिलंय, 'भावा आणि बहिणींनो आज मी माझ्या आयुष्यातील  एका महत्त्वाच्या गोष्टीबाबत तुम्हाला सांगणार आहे. मी कित्येक वर्षांपासून शो-बिझचं आयुष्य जगतेय आणि तेव्हापासून मला प्रत्येक प्रकारची प्रसिद्धी, इज्जत आणि पैसा माझ्या चाहत्यांकडून मिळाला आहे. ज्यासाठी मी आभारी आहे.'

तिने पुढे लिहिलंय, 'आता गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात विचारांना असा कब्जा केला आहे की जगात येण्याचा उद्देश केवळ पैसा आणि प्रसिद्धी एवढाच आहे का. त्याचे आपण ऋण फेडू शकत नाही का? माणसाला हा विचार का नाही येत की कोणत्याही क्षणी आपला मृत्यु होऊ शकतो. आणि मेल्यानंतर या सगळ्या गोष्टींच काय होणार आहे? या दोन प्रश्नांची उत्तरं मी शोधत आहे. खासकरुन दुस-या प्रश्नाचं उत्तर की मेल्यानंतर माझं काय होईल? खरं तर हे आयुष्य मेल्यानंतरचं आयुष्य सुखी करण्यासाठी मिळालं आहे. आज मी माझं शो-बिझ सोडून माणुसकीची सेवा आणि मला जन्म देणा-या त्या अल्लाच्या आदेशाचं पालन करण्याचं ठरवलं आहे. '

सना खानने २००५ मध्ये 'यही है हाय सोसायटी' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल', 'हल्ला बोल', 'जय हो', 'वजह तुम हो' सारख्या सिनेमांमध्ये दिसली होती. काही दिवसांपूर्वी सना वेब सिरीजमध्ये झळकली होती. हिंदी सिनेमांव्यतिरिक्त सनाने तेलुगु आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे.   

bigg boss fame and actress sana khan bids goodbye to film industry  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com