
Kiran Mane: चांगल्या भुमिकांची माती झालेली बघताना.. किरण मानेंची मराठी सिनेमांवर पोस्ट चर्चेत
Kiran Mane News: बिग बॉस मराठी ४ मधून अभिनेते किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने विविध सामाजिक, राजकीय आणि सिनेमाविषयक विषयांवर स्वतःची मतं मांडताना दिसतात.
किरण माने यांनी नुकतंच तेंडल्या हा मराठी सिनेमा पाहिला. किरण माने यांना हा मराठी सिनेमा प्रचंड आवडला.
किरण माने यांनी तेंडल्या बद्दल कौतुकोद्गार काढले पण मराठी सिनेमांवर सुद्धा खरमरीत टीका केली.
(bigg boss fame marathi actor kiran mane spoke very clearly about Marathi movies)
किरण माने लिहीतात... 'तेंडल्या' बघून आल्यानंतरबी मनात घर करून रहातो, तो त्यातला गजा... गजानन ! पैज लावून सांगतो, सिनेमा बघताना माझ्या पिढीतला प्रत्येकजण 'गजा' झाल्याशिवाय रहाणार नाय.
लहानपणी आपण बघितलेली छोटीछोटी, पण त्याकाळात डोंगराएवढी वाटणारी स्वप्नं... ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस घेतलेला ध्यास... लागलेलं वेड... त्यासाठी झालेला त्रास... वेदना... आणि स्वप्नपूर्तीनंतरचा आनंद. हे सगळं-सगळं आठवतं !
पुढे सध्याच्या मराठी सिनेमांवर किरण माने लिहीतात.. "फिरोज शेख हा अभिनेता गजा अक्षरश: जगलाय... छोट्या-छोट्या बारकाव्यांनिशी आपल्यासमोर जिवंत केलाय...
अलिकडच्या काळात मराठीत एवढे पिच्चर येताहेत, पण अभिनयाच्या बाबतीत मन मोहून टाकेल असा अभिनय नाही बघायला मिळाला...
उलट चांगल्या भुमिकांची माती झालेली बघताना घुसमट व्हायची... त्या त्रासातनं इस्लामपूरच्या या पठ्ठ्यानं सुटका केली. लै लै लै समाधान वाटलं.
कितीतरी दिवसांनी पडद्यावर एक अस्सलपणे, मनापासुन, अभ्यासून साकारलेली भुमिका पहायला मिळाली. जीव थंडगार झाला."
किरण माने शेवटी लिहीतात.. "रोज, भावा... पिच्चर संपल्यावर तुला शोधत आलो. तुला घट्ट मिठी मारली. तुझं मनभरुन कौतुक केलं. तू बी नंतर मला बोलतं करून तुझ्या मोबाईलमधी माझ्या भावना टिपून ठेवल्यास.
यापूर्वी तू माझा फॅन होतास, पण आता मी तुझा जबरा फॅन झालोय. अजूनबी तुझा 'गजा' पिच्छा सोडत नाय. अजून खूप कौतुक करायचं राहून गेलंय. लै मोठ्ठा हो भावा... तुझी सगळी स्वप्नं साकार होऊदेत.. लब्यू"