
Nikki Tamboli: Nikki Tamboli: 'मी रोज मरत होते', निक्कीने केले धक्कादायक खुलासे...
'बिग बॉस 14' निक्की तांबोळी नेहमीच तिच्या जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या जबरदस्त स्टाइलने चाहत्यांना वेड लावत असते. निक्की कोणत्याही विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त करून चाहत्यांची मनं जिंकते. मात्र, 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळीसोबत असे काही घडले, ज्यानंतर ती खूप तणावाखाली राहू लागली. नुकतीच या अभिनेत्रीने याबद्दल चर्चा केली आहे.
निक्की तांबोळीने 4 मे 2021 रोजी तिचा भाऊ जतिन तांबोळीला कोरोना विषाणूमुळे गमावले. तेव्हापासून निक्की तांबोळी आतून तुटली होती. तिला अजून स्वतःवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, निक्की म्हणाली, "'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर मला अनेक ऑफर आल्या, पण मी योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हते. भावाला गमावल्याच्या दुःखाशी झुंज देताना, ही गेली दोन वर्षे खूप कठीण गेली आहेत. मी तुटले होते आणि माझ्या भावाची आठवण करून सकारात्मक राहणे कठीण होते. हजारो लोकांमध्ये हसायचे, पण आतून मरत होते".
हेही वाचा: Athiya-Rahul wedding: सुनील शेट्टीची लव्हस्टोरी पिक्चरपेक्षा कमी नाही, जाणून घ्या केएल च्या सासूबाईंबद्दल
निक्की तांबोळी पुढे म्हणाली, “वेळ निघून जाते, पण त्याने मागे सोडलेल्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येत राहतात. मला काही नकारांचाही सामना करावा लागला आणि काही म्युझिक व्हिडीओना मी नाही म्हटले. मला वाटते जे काही घडले ते एका कारणासाठी घडले आणि कदाचित माझ्यासाठी दुसरे काहीतरी चांगले होईल. 'बिग बॉस 14' नंतर निक्की तांबोळी रोहित शेट्टीच्या शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये देखील दिसली होती.