Shiv Thakare: शिव ठाकरेनं वडिलांना दिलं खास वचन.. फोटो शेयर करत म्हणाला, तुम्हाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss fame shiv thakare share instagram story photo with his father and give him promise

Shiv Thakare: शिव ठाकरेनं वडिलांना दिलं खास वचन.. फोटो शेयर करत म्हणाला, तुम्हाला..

Shiv Thakare : शिव ठाकरे हे नाव माहीत नसेल असं कुणीही नाही. कारण गेल्या काही वर्षात मनोरंजन विश्वात विशेष करून टेलिव्हिजन वर हे नाव सातत्याने घेतलं जात आहे. त्यामुळे शिव ठाकरे आता घराघरातच नाही तर मनमनात पोहोचला आहे.

एम टिव्ही 'रोडीज' मधून आलेला हा अमरावतीचा शिव ठाकरे बघता बघता तरूणांना भुरळ घालून गेला. मग त्याने बिग बॉस मराठी गाजवलं आणि जिंकलंही. तिथे त्याचं आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं प्रेमप्रकरण हा मोठा चर्चेचा विषय झाला, आणि पुढे दोघेही वेगळे झाले.

मग त्याने नुकत्याच झालेल्या बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वात सहभाग घेतला आणि त्याचे चाहते देशभरात पसरले. टॉप 2 स्पर्धकांमध्ये शिवचा समावेश झाला. या पर्वातून शिव ची एक वेगळी ओळख समोर आली. लवकरच तो नव्या शो मध्ये दिसणार आहे. पण त्या अआधी त्याने आपल्या वडिलांना एक वचन दिलं आहे.

नुकतीच शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले.  शिवनं त्याच्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्याने वडिलांना एक वचन दिलं आहे. "माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... मिस्टर 'मनोहरराव उत्तमराव झिंगूजी गणूजी ठाकरे' मी तुम्हाला वचन देतो की, तुम्हाला नेहमी माझा अभिमान वाटेल." असे शिवने कॅप्शं दिले आहे.


शिव सोशल मीडियावर सतत काहीतरी पोस्ट करत असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. जवळपास इन्स्टाग्रामवर त्याचे 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्या या पोस्टला सोशल मीडियावरील चांगलीच पसंती मिळत असून त्याचे कौतुक होत आहे.

bigg boss fame shiv thakare share instagram story photo with his father and give him promise

bigg boss fame shiv thakare share instagram story photo with his father and give him promise

लवकरच शिव कलर्स वरील 'खतरोके खिलाडी' या कार्यक्रमात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.