मराठी नेता अभिजीत बिचुकले याची बिग बॉस १५ एंट्री..| Abhijit bichukalebichukale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abhijit bichukale

मराठी नेता अभिजीत बिचुकले याची बिग बॉस १५ एंट्री..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १५ हा चांगलाच गाजत आहे. हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. घरात होणारे टास्क, वाद-विवाद आणि धमाल चाहत्यांना आवडत आहे. त्यात आता लवकरच शोमध्ये काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. त्यात मराठी नेता अभिजीत बिचकुले हे वाईल्ड कार्डने बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत.

आपल्या विधानांमुळे प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचकुले हे बिग बॉस मराठी २ चे स्पर्धक होते. २०१५ मध्ये बिग बॉस मराठीच्या सेटवरून अभिजीतला चेक बाउंस झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात सातारा कोर्टने अरेस्ट वॉरंड जारी केलं होत. अटक करण्यापूर्वी अभिजीतला अनेकदा समन्स देण्यात आला होता. अभिजीतने नगर निकम ते पार्लिमेंटपर्यंत सगळ्या निवडणूका केल्या, पण त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक जिंकली नाही.

हेही वाचा: अक्षयच्या 'सूर्यवंशी'वर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली..

शिवाय बिचुकलेचा बऱ्यापैंकी मोठा चाहता वर्ग आहे, जे त्याला पाठिंबा देतात. बिग बॉस मराठी २ च पर्व बिचुकलेने चांगलच गाजवलं होत. आता हिंदीतील बिग बॉसमध्ये तो काय धमाल रंगवणार, यासाठी त्याचे चाहते फारचं उत्सुक आहे.

loading image
go to top