esakal | BBM 3: आविष्कारने स्नेहाला मिठी मारत मागितली माफी
sakal

बोलून बातमी शोधा

sneha wagh and aavishkar

Bigg Boss Marathi 3: आविष्कारने स्नेहाला मिठी मारत मागितली माफी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळाला. शनिवारच्या चावडीत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी आविष्कारवर 'सर्वांत कमकुवत स्पर्धक' म्हणून टीका केली. हे ऐकून भावूक झालेल्या आविष्कारला सुरेखा कुडची आणि विशाल निकम यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या बाजूला स्नेहा वाघ बसली होती. त्यांच्यातील संभाषण ती ऐकत होती. स्नेहा त्याच्याकडे पाहत असल्याचं विशालने आविष्कारला सांगितलं. तेव्हा आविष्कारने मागे वळून स्नेहाला मिठी मारली आणि तिची माफी मागितली.

"केवळ माफीने सर्वकाही बदलत नाही. जे काही घडून गेलंय ते बदलणार नाही", अशा शब्दांत स्नेहा आविष्कारला उत्तर देते. त्याचप्रमाणे भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल बिग बॉसच्या घरात चर्चा न करण्याचा सल्ला स्नेहाने आविष्कारला दिला.

हेही वाचा: BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. स्नेहाने आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. "मी खूप वेदना सहन केल्या आहेत. पतीच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं", असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. आविष्कारला घटस्फोट दिल्यानंतर सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. इंटेरिअर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आठ महिन्यांतच स्नेहा आणि अनुराग विभक्त झाले.

loading image
go to top