Trupti Desai in BBM3 | तृप्ती देसाईंनी 'बिग बॉस'मध्येही जपलं सामाजिक भान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trupti-Desai

त्यांचा निर्णय वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

BBM3: तृप्ती देसाईंनी 'बिग बॉस'मध्येही जपलं सामाजिक भान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

BIGG BOSS Marathi 3: बिग बॉस मराठी सीझन ३ सध्या चांगलंच रंगलं आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉसचं हे पर्व गाजतंय. स्पर्धकांची होणारी भांडणं, त्यांची धमाल, मस्ती आणि टास्क प्रेक्षकांना आवडतंय. बिग बॉसच्या घरात दर आठड्याला एक स्पर्धकाला घराबाहेर जावं लागतं. काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई नॉमिनेट झाल्या आणि त्यांना घराबाहेर जावं लागलं. घराबाहेर गेल्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात त्यांना मिळालेल्या मानधनाचं त्या काय करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबद्दलचं उत्तर त्यांना एका मुलाखतीमध्ये दिलं.

हेही वाचा: 'पृथ्वीराज' चित्रपटातील कलाकारांचा 'कडक लूक'; फोटो पहा...

बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाईंनी त्यांचा मोर्चा आंदोलनाकडे वळवला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी एका विधायक उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानंतर 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या महत्त्वाच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. सामजिक जीवनात कार्य करण्याची उर्मी असलेल्या तृप्ती देसाईंनी मुलाखतीत सांगितलं की त्या लवकरच राज्यात एक उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य म्हणून त्या आपल्या बिग बॉसमधून मिळालेल्या मानधनाचा वापर करणार आहेत. "मी बलात्कारमुक्त महाराष्ट्र हा नवीन उपक्रम हाती घेणार आहे. या उपक्रमासाठी मी 'बिग बॉस'कडून मिळालेले मानधन वापरेन आणि राज्यातील स्त्रियांची मदत करेन", असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. थोडक्यात, तृप्ती देसाई या 'बिग बॉस' सारख्या शो मधील पैसाही सामाजिक भान जपत सत्कारणी लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Trupti-Desai

Trupti-Desai

हेही वाचा: तृप्ती देसाई म्हणाल्या, आता मी ३१ डिसेंबरला पुन्हा येईन

नुकतीच तृप्ती देसाई यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली. त्या जवळपास ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. त्यांनी प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवली. त्यांचा घरातील वावर आणि सामाजिक जीवनातील वावर यात खूप फरक असल्याचे प्रेक्षकांनाही जाणवले. आंदोलनावेळी आक्रमक होणाऱ्या तृप्ती देसाई आणि खऱ्या आयुष्यात प्रेमळ तृप्ती ताई यातला फरक लोकांनी जवळून पाहिला. तृप्ती देसाई यांची बिग बॉसच्या घरात संतोष म्हणजेच दादुस यांच्याशी चांगलीच गट्टी जमल्याची दिसून आली.

loading image
go to top