esakal | टास्क जिंकण्यासाठी काहीपण! गायत्री देणार मिरचीची धुरी
sakal

बोलून बातमी शोधा

टास्क जिंकण्यासाठी काहीपण! गायत्री देणार मिरचीची धुरी

टास्क जिंकण्यासाठी काहीपण! गायत्री देणार मिरचीची धुरी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'हल्ला बोल' हा नवीन टास्क सुरू होणार आहे. या टास्कमध्ये समोरच्या टीमला मोटर बाईकवरुन उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच टास्कसंदर्भात टीम चर्चा करताना दिसणार आहे. उत्कर्ष-अक्षय, गायत्री -जय, स्नेहा - मीरा, तृप्ती देसाई - संतोष म्हणजेच दादूस या ग्रुप्समध्ये टास्क सुरू होण्याआधी चांगलीच चर्चा रंगली आहे. कसं आणि काय काय गोष्टींचा वापर करून सदस्यांना उठवता येईल, याची ही चर्चा सुरू आहे. हल्ला बोल टास्क मध्ये कोणाकोणाचे वाद होणार, कोणत्या गोष्टींचा वापर केला जाणार, हे पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने आपापली युक्ती सांगितली आहे. यात अभिनेत्री गायत्री दातारने वेगळीच कल्पना सुचवली. मी मिरचीची धुरी देणारच, असं ती म्हणाली. गायत्रीची ही कल्पना ऐकून सर्वच चकीत झाले. कोणी सांगितलं कचरा टाकुया, तर कोणी म्हणालं अंडी फोडूया, कोणी म्हटलं साबणचं पाणी टाकुया. आता कोणाची युक्ती किती यशस्वी ठरणार हे आगामी भागात पहायला मिळेल.

हेही वाचा: "..तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल"; शिवलीलाने सुनावलं

हेही वाचा: 'जगा सांगे तत्वज्ञान..'; जुन्या व्हिडीओमुळे शिवलीला होतेय ट्रोल

गायत्री दातारने 'तुला पाहते रे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावेसोबत भूमिका साकारली होती. मालिकेनंतर सोशल मीडियावर सक्रिय असणारी गायत्री आता बिग बॉसच्या घरात तिच्या युक्त्यांमुळे चर्चेत आहे. शनिवारच्या चावडीत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी गायत्रीला चांगलंच सुनावलं होतं. मीराची साथ देऊन टास्क रद्द करण्यास गायत्रीने भाग पाडलं होतं. त्यामुळे मीरा आणि गायत्री या दोघांची शाळा महेश मांजेरकरांनी घेतली होती.

loading image
go to top