Bigg Boss Marathi 3: मीरा म्हणतेय, "तोच जिंकू शकतो बिग बॉस मराठीची ट्रॉफी"

विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत.
Mira Jagannath, Bigg Boss Marathi 3
Mira Jagannath, Bigg Boss Marathi 3

बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) या लोकप्रिय शोच्या गुरुवारच्या भागात मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यामुळे आता पाच स्पर्धक घरात राहिले असून येत्या २६ डिसेंबर रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी बोलताना मीराने तिचा प्रवास आणि तिच्या मते बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकू शकेल याबद्दल मत व्यक्त केलं. मीरा बिग बॉसच्या घरात ९० हून अधिक दिवस राहिली. पहिल्या दिवसापासून मीरा तिच्या भांडणांमुळे चर्चेत होती.

घरातून बाहेर पडल्यावर काय वाटतंय, असा प्रश्न मांजरेकरांनी तिला विचारला. त्यावर मीरा म्हणाली, "ग्रँड फिनालेच्या आधीच घराबाहेर पडल्याने मी फार दु:खी आहे. मला फिनालेपर्यंत घरात थांबायचं होतं. मी फिनालेपर्यंत पोहोचू शकली नाही याची खंत नेहमीच माझ्या मनात राहील." त्यानंतर मांजरेकरांनी मीराचं विजेत्याबाबत प्रामाणिक मत काय आहे, ते विचारलं. "तुझ्या मते कोण विजेता ठरू शकतो", असा सवाल त्यांनी केला. त्यावर उत्तर देताना मीराने सांगितलं, "माझ्या मते विशाल निकम हा शो जिंकू शकेल. त्याच्यामध्ये अशी काहीतरी खास बाब नक्की आहे, ज्यामुळे तो विजेता ठरेल असं वाटतं. टास्कदरम्यान त्याने कधीच शिवीगाळ केली नाही. तो स्वत:च्या वेगळ्या पद्धतीनेच संपूर्ण खेळ खेळत राहिला आणि त्यामुळेच तो विजेता ठरेल असं वाटतं."

Mira Jagannath, Bigg Boss Marathi 3
'मला सेक्सचं व्यसन होतं,' विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेवल्याची अभिनेत्याची कबुली

विशालने 'तिकिट टू फिनाले'चं टास्क जिंकत ग्रँड फिनालेमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. येत्या २६ डिसेंबर रोजी बिग बॉस मराठी ३चा विजेता कोण ठरणार, हे प्रेक्षकांना कळेल. ग्रँड फिनालेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची सुरुवात झाली. 'बिग बॉस मराठी ३'च्या विजेत्याला २० लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. याआधी बक्षिसाची किंमत ही २५ लाख रुपये होती. मात्र यंदाच्या सिझनमध्ये ती कमी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com