BBM 3: विकास, मीनलला विसरा; ट्रॉफीसाठी जय-विशालमध्ये चुरस?

'बिग बॉस मराठी ३'च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला
Jay Dudhane and Vishal Nikam
Jay Dudhane and Vishal Nikam

१०० दिवसांच्या प्रवासानंतर अखेर 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 3) तिसरं सिझन अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. २६ डिसेंबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. विशाल निकम, विकास पाटील, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. या पाच जणांपैकी एकच स्पर्धक ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर नुकताच प्रोमो पोस्ट करण्यात आला असून त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या प्रतिक्रियांमध्ये विशाल आणि जय ही दोन नावं सर्वाधिक पहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून हे दोघं तुफान चर्चेत आहेत. या दोघांना तगडे स्पर्धक मानलं जातंय. त्यामुळे अंतिम फेरीत विशाल आणि जयमध्ये चुरस रंगेल असा अंदाज वर्तवला जातोय. (Vishal Nikam Vs Jay Dudhane)

१५ सदस्यांसोबत बिग बॉसच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त पाच सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली. या १०० दिवसांत हे सदस्य अनेक भावभावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या घराला घरपण आलं. पण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार आहे.

Jay Dudhane and Vishal Nikam
Bigg Boss Marathi 3: मीरा म्हणतेय, "तोच जिंकू शकतो बिग बॉस मराठीची ट्रॉफी"

घराचा दरवाजा आता शेवटचा उघडणार आहे. फरक इतकाच असणार की, यावेळेस दरवाजा पलीकडे उभे असणार आहेत बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप २ सदस्य आणि त्यातून एक पर्वाचा महाविजेता ठरणार आहे. हे टॉप २ सदस्य विशाल आणि जय असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळे विजेता कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ३ चा ग्रँड फिनाले येत्या २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com