Bigg Boss Marathi 4: मांजरेकरांच्या टीकेवर बिचुकले भडकला, म्हणाला ते तर पगारी अँकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi 4 abhijeet bichukale challenge to mahesh manjrekar says in future i will be anchor of this show

Bigg Boss Marathi 4: मांजरेकरांच्या टीकेवर बिचुकले भडकला, म्हणाला ते तर पगारी अँकर

bigg boss marathi 4 : ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची उत्कंठा संपली असून येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. नुकतीच बिग बॉसची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी महेश मांजरेकर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिजीत बिचुकलेबाबत भाष्य केले. पण ते सहन न झाल्याने अभिजीतनेही मांजरेकरांना सडेतोड उत्तर दिले आहे. (bigg boss marathi 4 abhijeet bichukale challenge to mahesh manjrekar says in future i will be anchor of this show)

बिग बॉस मराठीच्या मागच्या पर्वातील चर्चेत आणि तितकाच वादग्रस्त चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले. सध्या त्याने महेश मांजरेकर यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. नुकताच बिग बॉस मराठी 4चा लाँचिंग इव्हेंट झाला. यावेळी महेश मांजरेकरांना विचारण्यात आले की, कोणत्या स्पर्धकांना पुन्हा पाहायला आवडेल आणि कोणाला नाही. त्यावर मांजरेकर म्हणाले. अभिजीत बिचुकलेंना पाहायला आवडणार नाही. 'बिचुकले गेममध्ये भाग घेत नव्हता. त्याच्यात तो usp आहे पण तो किती वेळ पाहणार. घरात ऑलराऊंडर प्लेअर पाहिजेच. तिथे असलेल्या प्रत्येकाचा एक usp आहे.'असेही ते म्हणाले.

पण हे उत्तर बिचुकलेला मात्र चांगलेच झोंबले आहे. महेश मांजरेकरांनी केलेल्या या वक्तव्यावर बिचुकलेंनीही उत्तर दिले आहे. 'महेश मांजरेकर पैसे घेऊन तिथे नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं?.. एंडेमोल कंपनीनं मला मोठं केलं. सेकंड सीझन माझा कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला? याची  एंडेमोल कंपनीला जाण असेल तर महेश मांजरेकरांच्या कोणत्याही वक्तव्याला ते महत्त्व देणार नाही.  भविष्यात मी बिग बॉसचा अँकर होईन, असा मला विश्वास आहे'. असे विधान बिचुकलेने केले आहे.