Bigg Boss Marathi 4: बोल्डनेसचा कहर, कोण आहेत हे स्पर्धक? प्रोमो व्हायरल..

'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांचा पहिला प्रोमो आऊट, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह..
bigg boss marathi 4 grand premiere first participant neha khan
bigg boss marathi 4 grand premiere first participant neha khan sakal

Bigg Boss marathi season 4 : 'बिग बाॅस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. नुकतेच कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोन स्पर्धक अत्यंत बोल्ड लुक मध्ये दिसत आहेत. आता हे स्पर्धक नेमके कोण आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. काहींनी आपापले अंदाजही वर्तवले आहेत. (bigg boss marathi 4 grand premiere first participant neha khan )

बिग बॉस मराठी 4 च्या ग्रँड प्रीमियरची पहिली झलक समोर आली आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातील दणक्यात एंट्री होणार आहे. अत्यंत बोल्ड असा तिचा अंदाज दाखवण्यात आला आहे. ' मोहे अंग लगादे'  या गाण्यावर डान्स करत अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्रीनं प्रोमोमध्येच प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. पण बिग बॉसच्या घरात जाणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे काही कळू शकलेलं नाहीये. अभिनेत्रीचा चेहरा नीटसा काही दिसत नाहीये. पण प्रेक्षकांनी मात्र तिला पाहून अंदाज लावला आहे.

बिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री नेहा खान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. नेहा खान म्हणजेच लोकप्रिय 'देवमाणूस' या मालिकेतील पोलीस ऑफिसर दिव्या सिंग. ही नेहा खानच असणार असं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे. नेहाला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वासाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र तेव्हा मालिका सुरू असल्यानं नेहानं ऑफर नाकारली होती. पण ती चौथ्या पर्वात दिसणार अशी चर्चा मागेही सुरू होती, या प्रोमोने ती अधिकच स्पष्ट झाली.

बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची उत्कंठा संपली असून येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com