Bigg Boss marathi 4: जशास तसं उत्तर देणारी अपूर्वा झाली भावूक! रडत म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss marathi 4 strong contestant apurva nemlekar get emotional and crying

Bigg Boss marathi 4: जशास तसं उत्तर देणारी अपूर्वा झाली भावूक! रडत म्हणाली..

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल कॉमन मॅन त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले. आज त्याच्याविषयी अपूर्वा आणि अक्षय चर्चा करताना दिसणार आहेत. अपूर्वा अक्षयला त्रिशूलविषयी काही गोष्टी सांगताना दिसणार आहे. आणि तेच सांगताना तिला अश्रू अनावर झाले आहेत.

(Bigg Boss marathi 4 strong contestant apurva nemlekar get emotional and crying)

अपूर्वा अक्षयला म्हणाली, 'त्याच्याबरोबर (त्रिशूल) ना एक वेगळी बॉण्डिंग होती.' अक्षयचे म्हणणे आहे, "त्रिशूल हक्काचा व्यक्ती होता." अपूर्वा म्हणाली, "हो हक्काचा एक व्यक्ती यार. मी त्याचं वाक्य कधीच नाही विसरणार, तो मला काय म्हणाला, 'धोंगडे तुझ्याबाबतीत असं बोली ना नेक्स्ट डे मी तिच्याशी बोलायला गेलो आणि मी तिला सांगितलं की, तू चुकते आहेस. तू एकदा अपूर्वाला जाणून घे ती तशी नाहीये.. जशी तुला दिसते आहे. पण, तिच्याशी बोलायला लागशील ना तेव्हा तुला लक्षात येईल ती खूप चांगली आहे.'

हेही वाचा: Rakhi Sawant: हिचे पॉर्न व्हिडिओ माझ्याकडे.. राखी सावंतकडून शर्लिनची पोलखोल; गुन्हा दाखल!

पुढे ती म्हणाली, 'हे अगदी नकळतपणे तो माझ्याविषयी बोलत होता आणि मला ते इतकं भारी वाटतं होतं. असं कोणीच नाही बोललं माझ्याशी. मला आता खूप एकटं वाटतं आहे.” अक्षय म्हणाला, “एकटं नाही वाटून घ्यायचं मी आहे ना अजून.' अपूर्वा म्हणाली, इथे सगळ्यांच्या मनात खूप द्वेष आहे माझ्यासाठी...” त्यामुळे ही चर्चा अजून किती रंगणार हे आजच्या भागात कळेल.

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता एक महिना झाला आहे. त्रिशूलच्या घराबाहेर जण्याने आता केवळ 13 स्पर्धक घरामध्ये उरले आहे. त्यामुळे घरामध्ये राहण्यासाठी प्रत्येकजन जीव तोडून खेळत आहे. वाद, भांडण राडे सुरूच आहेत शिवाय रोज नवी खेळी नवा डाव बघायला मिळत आहे. आजच्या भागात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi