Dadus Video Viral: प्रसिद्ध संगीतकाराच्या हळदीत बिग बॉस फेम दादुसचा हवेत गोळीबार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi fame dadus aka santosh chaudhari gun shoot in air at musicians sachin bhangre haldi ceremony

Dadus Video Viral: प्रसिद्ध संगीतकाराच्या हळदीत बिग बॉस फेम दादुसचा हवेत गोळीबार..

Dadus Video Viral: बिग बॉस मराठीतील गाजलेला चेहरा आणि कोळी गीतांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे गायक संतोष चौधरी उर्फ दादूस.. आज वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. नुकतेच ते वादक आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन भांगरे याच्या हळदीत सहभागी झाले होते. यावेळी गाणं गात असताना त्यांनी खिशातून आपली बंदूक काढून हवेत गोळीबार केला...

bigg boss marathi fame dadus aka santosh chaudhari shoot in air at musicians sachin bhangre haldi ceremony

दादुसचे गाण्यांचे कार्यक्रम ही पर्वणी असते. लोक लाखों रुपये खर्च करून दादुसला बोलावतात. त्यातही हळदीचा कार्यक्रम म्हणजे दादूस हवाच. हाच दादुस दोन दिवसांपूर्वी वादक सचिन भांगरे याच्या हळदी समारंभात आला होता.

मुंबईतील शिवडीच्या एका चाळीत या हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दादुस यांनी आपल्या गाण्याने सर्वांना नाचायला भाग पाडले. आणि कार्यक्रम सुरू असतानाच मंचावर उभ्या असलेल्या दादुसने खिशातून बंदूक काढली आणि हवेत गोळीबार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ आर के मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलीसांचा तपास सुरू आहे.  या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सचिन भांगरे यांच्या घरी गेले होते पण तेव्हा त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते.

या संदर्भात पोलिसांनी भांगरे कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी संतोष चौधरी यांनी वापरलेली बंदूक खेळण्यातली असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी पुढील चौकशीसाठी पोलिस दादुस म्हणजेच संतोष चौधरी यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी काही गैर आढल्यास दादुस वर कारवाई देखील होऊ शकते.