
Bigg Boss OTT 2 Grand Finale: गेल्या काही महिन्यांपासून बिग बॉस ओटीटी 2 ने प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केले आहे. आता या शोच्या फिनालेसाठी काहीच तास शिल्लक राहिले आहे. काही तासातच शोचा महाविजेता कोण बनणार याची चर्चा रंगत होत्या.
मात्र आता सोशल मीडियावर या शोच्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे. सोशल मिडियावर आपापल्या आवडत्या स्पर्धकांना जिंकून देण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे
बिग बॉसचा फिनाले 14 ऑगस्टला होणार आहे. आपल्या लाडक्या स्पर्धकांला जिंकवण्यासाठी वोटिंग लाईन्स या सुरु आहेत. बिग बॉस ओटीटी 2 चा फिनाले फक्त दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत.
आता बिग बॉसच्या घरात टॉप 5 फायनलिस्ट आहेत. ज्यामध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, बेबीका, एल्विश यादव आणि मनीषा राणी हे आहेत. त्यात आता ट्विट आणि सोशल मीडियावर स्पर्धकांना जिंकवून देण्यासाठी चाहते आपल्या लाडक्या स्पर्धकाला वोट करण्याचे आवाहन करत आहेत.
सध्या घरात दोन मजबूत स्पर्धक आहेत. त्यात एक आहे एल्विश यादव आणि दुसरा आहे अभिषेक मल्हान. दोघेही स्वतःला बिग बॉस ओटीटी 2 चा विनर मानतात. या शोमध्ये एल्विश वाइल्ड कार्ड असला तरी, तो हा शो जिंकेल असा विश्वास त्याला आहे तर पहिला फायनलिस्ट ठरलेला अभिषेक स्वत:ला बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी अधिक योग्य समजतो.
तर काहींना पूजा भट्ट ही तिच्या मजबूत इमेजसाठी आवडते. मनीषा राणीचा मजेदार स्वभाव आणि बेबिका ध्रुवेचा लूक प्रेक्षकांना खुप आवडतो. अशा परिस्थीत एल्विशला चाहत्यांचे खुप प्रेम मिळत आहे. चाहत्यांसोबतच बिहार सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांनी एल्विश यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अनेक ठिकाणी एल्विशला वोटिंग करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. #VoteForElvish #ElvishForTheWin #ElvishYadav #BiggBossOTT2 #BBOTT2 असे अनेक हॅशटॅग एल्विशसाठी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर एल्विशला बाहेरच्या जगात खूप प्रेम मिळत आहे. अशा परिस्थितीत आता कोण या पर्वाचा विजेता ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.