
Bigg Boss Ott 2: रितेशसोबत दिसलेली जिया बिग बॉसमध्ये 'वेड' लावण्यासाठी तयार! तर आणखी 'ही' संस्कारी सूनही गाजवणार सिझन
bigg boss ott 2 confirm contestants jiya shankar palak purswan: गेल्या काही दिवसांपासून OTT बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळचा बिगबॉसचा सिझन करण जोहर होस्ट करणार नसून सलमान खानच हा सिझन होस्ट असल्याने भाईजानचे चाहते खुप उत्सूक असून या शोची आतुरतेने वाट पहात आहे. त्याचबरोबर या सिझनबद्दल अपडेट जाणुन घेण्यासाठी देखील चाहते उत्सूक आहे.
OTT बिग बॉस 2 पुनरागमन करणार आहे. हा रिअॅलिटी शो 17 जून रोजी JioCinema वर प्रदर्शित होणार आहे.
त्यामुळे यावेळी 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या भागात कोण स्पर्धक सहभागी होणार या हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.
आता या शोच्या स्पर्धकांबद्दल मोठी अपडेट आली आहे. शोसाठी अभिनेत्री जिया शंकरचे नाव फायनल करण्यात आलं आहे.
जिया शंकर बद्दल बोलायचं झालं तर ती एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग तगडा आहे. तिने अनेक टिव्हि शो आणि मालिकामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.
त्याचबरोबर जिया ही रितेश देशमुखचा सुपरहिट चित्रपट 'वेड' मध्येही दिसली होती. या चित्रपटात तिने रितेशच्या प्रियसीची भुमिका साकरली होती.
या चित्रपटातील तिची भुमिका प्रेक्षकांना खुप भावली होती. मराठी चित्रपटांपूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जिया खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.
सोशल मीडियावर चाहते तिला खूप पसंत करतात.त्याचबरोबर तिचे व्हिडिओ आणि फोटोदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.
जियानं मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली त्यानंतर ती 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने 'काटेलाल अँड सन्स'मध्ये काम केले.
जियाने सब टीव्हीच्या 'गुड नाईट इंडिया' शो होस्ट केला आहे. तर जियाने अजय मंथेनासोबत तेलुगू चित्रपट 'एंथा उंडांगा उन्नावे' मध्ये काम केले. यानंतर त्याने आणखी एक तमिळ चित्रपट 'कनवू वरियम' केला.
तर मिडिया रिपोर्टनुसार, पलक परसवानी ही देखील 'बिग बॉस OTT 2' च्या या सीझनमधील दुसरी स्पर्धक म्हणुन कन्फर्म झाली आहे.
पलक 'स्प्लिट्सविला 7', 'बडी देवरानी', 'बडे भैया की दुल्हनिया', 'नास्तिक', 'मेरी हनीकारक बीवी' आणि 'ये रिश्ते हैं प्यार के' सारख्या शोचा भाग आहे. त्यानंतर ती 'रुहानियत' या वेब शोमध्येही दिसला आहे.
'बिग बॉस ओटीटी 2' पहिल्या सीझनप्रमाणे हा शो फक्त ऑनलाइन पाहता येणार आहे. Jio Cinemaवर फ्रिमध्ये असेल. शोचा भव्य प्रीमियर भाग 17 जून होणार आहे.