
Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटीमधुन करणचा पत्ता कट? आता 'हा' सुपरस्टार करणार होस्ट
'बिग बॉस' हा टिव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो असला तरी तो तितकाच लोकप्रिय देखील आहे. बिग बॉसचा 16 वा सिझन संपला आणि एम सी स्टॅन हा यंदाच्या सिझनचा विजेता बनला.
आता 'बिग बॉस ओटीटी'चा पहिला सीझन हिट झाल्यानंतर निर्माते दुसऱ्या सिझनच्या तयारीत आहे. या शोचा पहिला सिझन बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला होता.
मात्र आता जेव्हा या शोच्या दुसऱ्या सिझनबद्दल चर्चा सुरु असतांनाच यंदाचा 'बिग बॉस ओटीटी'चा करण जोहर होस्ट असणार नसून दुसऱ्या सुपरस्टारची या ठिकाणी वर्णी लागली आहे. असं बोललं जात आहे.
तर या सीझनचा होस्ट बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सलमानच्या होस्टिंगचा तर विषयचं वेगळा आहे. गेली अनेक सिझन त्याने टिव्ही वरिल बिग बॉस शोचं होस्ट केलं आहे. आता जर या वृत्तावर विश्वास ठेवला तर ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची ठरु शकते.
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचं झालं तर, दिव्या अग्रवाल या रिअॅलिटी शोची विजेती ठरली होती. तर इतर स्पर्धक शमिता शेट्टी, राकेश बापट, झीशान खान, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीनने या शोमध्ये त्यांची मने जिंकली.त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनसाठी अनेक स्टार्सची नावं चर्चेत आहेत. 'लॉक अप'चा विजेता मुनव्वर फारुकी याचाही रिअॅलिटी शोमध्ये दिसू शकतो. त्याला 'खतरों के खिलाडी 13' ची ऑफर आली होती मात्र पासपोर्टमधील समस्येमुळे त्याला जाणं शक्य झालं नाही.
मुनव्वरसोबतच अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये येत असल्याच्या बातम्या आहेत. बिग बॉस ओटीटी सीझन 2 मागील सीझनप्रमाणेच असणार आहे. हा शो तीन महिने चालणार असून त्याचे स्ट्रीमिंग व्हूटवर होणार आहे. मात्र आता पर्यंत निर्माते किंवा चॅनेलकडूने याबाबत काही माहिती दिलेली नाही.