
Bigg Boss OTT 2: लवकरच सुरु होतोय बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन.. होस्ट म्हणून करणचा पत्ता कट होण्याची चिन्ह..
Bigg Boss OTT 2: बिग बॉस १६ या रिअॅलिटी शो ला मिळालेल्या यशानंतर मेकर्स आता बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार बिग बॉस ओटीटीच्या मेकर्सनी रिअॅलिटी शो साठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. बोललं जात आहे की बिग बॉस ओटीटी चा दुसरा सीझन जून पासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल.(Bigg Boss OTT Season 2 coming soon update)
माहितीसाठी सांगतो की, बिग बॉस ओटीटी बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस चा स्पिन-ऑफ आहे. याचं थेट प्रसारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर केलं जातं. एक इथे आठवण करून देतो की बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनला करण जोहरनं होस्ट केलं होतं. या शो मध्ये उर्फी जावेद आणि इतरही अनेक सेलिब्रिटी सामिल झाले होते. पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती.
माहितीसाठी इथे सांगतो की बिग बॉस १६ संपल्यानंतर चाहते आता बिग बॉस ओटीटीची आतुरतेने वाट पाहत आहेत. बोललं जात आहे की यावेळी देखील बिग बॉस ओटीटीला करण जोहर होस्ट करणार आहे. पण सध्या तो आपला रिअॅलिटी शो 'कॉफी विथ करण' मध्ये व्यस्त आहे,त्यामुळे त्याचं बिग बॉस ओटीटी होस्ट करणं कठीण आहे असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे होस्ट म्हणून इतरही पर्याय मेकर्सनी तयार ठेवल्याचं कळत आहे.
बिग बॉसच्या चाहत्यांना आता जाणून घेण्याची उत्सुकता लागलीय की अखेर यावेळी ओटीटीवरील बिग बॉसमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सामिल होणार आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार बोललं जात आहे की 'बिग बॉस ओटीटी २' साठी मेकर्सनी अभिनेता तनुज केवलरमानीला मोठी ऑफर दिली आहे. अर्थात ती य़ा शो मध्ये येणार की नाही याविषयीची माहिती गुलदस्त्यात आहे.
माहितीसाठी सांगतो की तनुज व्यतिरिक्त मुनव्वर फारुकी,पूजा गोर,पूनम पांडे,जैद दरबार,संभावना सेठ सारख्या सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. पण अद्याप कन्फर्म लिस्ट समोर आलेली नाही.