बिग बॉसमधील चाहत्यांची 'लाडकी स्पर्धक' रुग्णालयात.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिग बॉसमधील चाहत्यांची 'लाडकी स्पर्धक' रुग्णालयात....
बिग बॉसमधील चाहत्यांची 'लाडकी स्पर्धक' रुग्णालयात....

बिग बॉसमधील चाहत्यांची 'लाडकी स्पर्धक' रुग्णालयात....

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसचे नाव घ्यावे लागेल. या शो नं लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या टीआरपीला आहोटी लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा शो आता बंद होणार असल्याच्या चर्चेला उत आला होता. आतापर्यत अनेक लोकप्रिय स्पर्धक या शो मधून आऊट झाले आहे. त्याचा परिणामही त्या शो च्या लोकप्रियतेवर झाला आहे. आता या शो मधून आणखी एक महत्वाची स्पर्धक बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.

त्या स्पर्धकाला तब्येतीत बिघाड झाल्यामुळे त्या शो मधून माघार घ्यावी लागल्याचे सांगण्यात आले आहे. राकेश बापट रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी अजून चाहत्यांच्या पचनी पडलेली नसताना आणखी एका स्पर्धकाची भर पडली आहे. त्या स्पर्धकाचे नाव शमिता शेट्टी असं असून ती यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक आहे. त्यामुळे सगळ्याच्या नजरा तिच्यावर होत्या. मात्र आता तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती दोन दिवसांनी पुन्हा स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र बिग बॉसच्या वतीनं कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान समोर आलेलं नाही. शमिता शेट्टीच्या अगोदर तिचा बॉयफ्रेंड राकेश बापटलाही देखील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला मुत्रविकाराची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिग बॉस हा शो नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. वादाशिवाय या शो ला रंग येत नसल्याच्या प्रतिक्रिया आता प्रेक्षक देऊ लागले आहेत.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

loading image
go to top