'माझ्या पोरीकडं किस मागतो': देवोलिनाची आई बिचुकलेवर संतापली

बिग बॉसची (bigg boss season 15) लोकप्रियता वाढावी म्हणून अनेक स्पर्धकांना वाईल्ड कार्डव्दारे इंट्री (wilid card) मिळाली आहे.
devolina bhattacharjee
devolina bhattacharjee

मुंबई - बिग बॉसची (bigg boss season 15) लोकप्रियता वाढावी म्हणून अनेक स्पर्धकांना वाईल्ड कार्डव्दारे इंट्री (wilid card) मिळाली आहे. जेणेकरुन प्रेक्षकांची या शोला पसंती मिळावी. गेल्या काही दिवसांपासून अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्ची हे दोघेही चर्चेत आले आहे. त्यांच्यामध्ये झालेल्या वादानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपासून देवोलिना आणि अभिजित यांच्यात वादावादी सुरु आहे. अभिजितनं सभ्यतेच्या सर्व पातळ्या ओलांडून देवोलिनाला किस करण्याची मागणी केली होती. यानंतर संतापलेल्या देवोलिनानं त्याच्यावर सडकून टीका केली होती. तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आताचा आठवडा बिग बॉसच्या घरात मोठा वाद रंगणार आहे. अभिजितला सलमानचा ओरडा खावा लागला आहे. त्यानं त्याची खूप बोलणीही खाल्ली आहेत. अभिजितनं देवोलिनाच्याबाबत केलेलं वक्तव्य बिग बॉसला आवडलेलं नाही. सलमाननं देवोलिना आणि अभिजितचा क्लास घेतला होता. आता तर देवोलिनाची आई अंतिमाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी अभिजितला खडे बोल सुनावले आहेत. अभिजितचे वाभाडे काढले आहेत. माझ्या मुलीला अशा प्रकारे बोलून तिचा अपमान करण्याचे काम अभिजितनं केलं आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा करा. असं अंतिमा यांनी म्हटलं आहे. वास्तविक अभिजितचं केवळ देवोलिनासोबत भांड़ण झालं आहे असं नाही तर त्यानं राखी सावंतशी देखील पंगा घेतल्याचे दिसून आले आहे.

devolina bhattacharjee
अभिजित बिचुकलेनं केला आत्महत्येचा प्रयत्न?'बिग बॉस१५' पुन्हा वादात...
devolina bhattacharjee
'बिग बॉस'च्या निर्णयावर माजी स्पर्धक देवोलिना संतापली

अभिजितच्या वक्तव्यावर अंतिमा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अभिजितला वाया गेलेला असं म्हटलं आहे. इटाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, देवोलिनाची आई म्हणते, जे काही झालं ते अतिशय राग आणणारं होतं. मला वाटलं अभिजित हा तिला आपल्या बहिणीप्रमाणे मानतो. मात्र प्रत्यक्षात त्याचे विचार काही वेगळेच असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला देवोलिनाला असं वाटलं होतं की, अभिजित तिची टिंगल करतो आहे. मात्र तो तसा करत नव्हता. त्यानं जे काही केलं त्याचं समर्थन होऊ शकत नसल्याचे अंतिमा यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com